कोथळी शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह

कोथळी शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह 
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
        कोथळी परिसरात १७ जानेवारी रोजी सकाळी एका ३२ वर्षाच्या तरुणाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. 
         फारुख शहा सलीम शहा याचा मृतदेह शनिवारी सकाळी ८ वाजता जयपुर कोथळी रोडवरील जुनना गावाजवळ आढळून आला. त्याची एम. एच. ३९ बीयू ७२४६ क्रमांकाची दुचाकी बाजूला पडलेली होती. याबाबत तरुणाचे नातेवाईक इस्लाम शहा यांनी सांगितले की, शुक्रवारी ते जमानत घेण्यासाठी गेले होते. त्यानंतर कोथळीकडे जाण्यासाठी काल १६ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता निघालो होतो. फारुख शहा जयसिंगपुर फाट्याकडे दुचाकीने रवाना झाला होता. लोणघाटला नातेवाईकांना सोडविण्यासाठी गेला होता. फारुखच्या वडीलांचा फोन आला की, फारुख अजून पर्यंत घरी पोहचला नाही. तर त्यांना सांगितले माझा ही फोन उचलत नाही. मी खूप वेळचा फोन लावत आहे. नंतर मग आम्ही त्याची रात्री ३ वाजेपर्यंत चौकशी केली. नातेवाईकातील एका जणाने त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती. फारुखच्या नातेवाईकांनी घातपातचा संशय व्यक्त केला आहे. घातपात की अपघात याप्रकरणी चौकशी बोराखेडी पोलिस करीत आहेत.