शिवसाई परिवार व माणस फाउंडेशन चा उपक्रम
* महिला सन्मान आठवड्यात विविध कार्यक्रमांचा जागर !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाण्यात महिला सक्षमीकरण चळवळीने चांगलाच जोर धरला आहे. यासाठी मानस फाउंडेशन व शिवसाई परिवाराने आठ दिवस विविध गावांमध्ये कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रमांसोबतच वैचारिक, शारीरिक समस्या व कायदेविषयक सल्लाही दिला जाणार आहे. नांद्राकोळी येथे महिला बालविकास अधिकारी अमोल दिघोळे यांच्याहस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. बीरसिंगपूर येथे 25 जानेवारी अभियानाचा समारोप होत आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने महिलांच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे ठीकठिकाणी आयोजन केले जाते. मात्र आजही या कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना सन्मानाने सहभागी करून घेतले जात नसल्याचे चित्र बहुतांश ठिकाणी पाहायला मिळते. विधवा, परितक्त्या, घटस्फोटीत, एकल महिलांसाठी बुलढाण्यातील दत्तात्रय लहाने यांच्या संकल्पनेतून मानस फाउंडेशन काम करत आहे. सध्या सुरू असलेल्या हळदी कुंकू, आणि इतर सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये विधवा घटस्फोटीत महिलांना सहभागी करून घेण्यासाठी मानस फाउंडेशन कडून आठवडाभर आठ गावांमध्ये जनजागृती अभियान राबवले जात आहे. याची सुरुवात बुलढाण्याच्या नांद्राकोळी गावापासून करण्यात आली. नांद्राकोळी गावामध्ये जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी अमोल दिघुळे यांच्या अध्यक्षतेखाली हळदी कुंकू कार्यक्रम पार पडला. दत्तात्रय लहाने आणि मानस फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी त्याचबरोबर गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यासह विविध क्षेत्रात काम करणारे नागरिक व महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
22 फेब्रुवारी रोजी जांभरुन येथे महिलांच्या आरोग्य विषयक समस्या यावर डॉक्टर माधवी जवरे विचार व्यक्त करणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.शाहीना पठाण राहणार आहे. 23 फेब्रुवारीला विशेष कार्यक्रम असून डॉक्टर कुणाल शेवाळे "मनोविकार" या विषयावर बोलणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य शाईंना पठाण आहे. शिवसाई युनिव्हर्सल येथे 24 फेब्रुवारी रोजी महिलांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उज्वला काळे राहणार आहे. एडवोकेट वर्षा पालकर कायदेविषयक माहिती महिलांना देतील. अतिथी म्हणून नगराध्यक्ष सौ.पूजाताई गायकवाड, सौ. जयश्रीताई शेळके यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. 25 जानेवारी रोजी बिरसिंगपूर येथे होणाऱ्या समारोपिय कार्यक्रमात महिला सक्षमीकरण काळाची गरज या विषयावर राजश्री गायकवाड यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य ज्योती पाटील राहणार आहे. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने व संचालकांनी केले आहे.
