बुलढाण्याची हर्षाली सोनोने राष्ट्रीय तांग सू डो स्पर्धेत पटकविले कांस्यपदक

बुलढाण्याची हर्षाली सोनोने  राष्ट्रीय तांग सू डो स्पर्धेत पटकविले कांस्यपदक 

बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       नवी दिल्ली येथे पार पडलेल्या १२ व्या राष्ट्रीय तांग सू डो स्पर्धेत बुलढाणा येथील पंकज लध्दड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट स्टडीज, पॉलिटेक्निक (येळगाव) येथील विद्यार्थिनी हर्षाली विजयकुमार सोनोने हिने उल्लेखनीय कामगिरी करत संस्थेच्या शीरपेचात मानाचा तुरा रोवला. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत हर्षालीने एका प्रकारात रौप्य, तर दुसऱ्या प्रकारात कांस्यपदक पटकावत संस्थेसह जिल्ह्याचे नाव देशभरात उज्ज्वल केले.

        नवी दिल्ली येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात भारतातील नामवंत कुस्ती प्रशिक्षक पद्मश्री महाबली सतपाल यांच्या हस्ते हर्षालीला पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हर्षालीला संस्थेचे प्राचार्य प्रा. सचिन दांडगे, पदविका समन्वयक प्रा. संतोष भोपळे, विभागप्रमुख प्रा. विनायक मगर,  प्रा. अमोल पाटोळे यांचे मार्गदर्शन लाभले. हर्षालीच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. दीपक लध्दड, सचिव डॉ. संगीता लध्दड यांनी तिचा सत्कार केला.