श्रीनिवास जाधवने राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेत कांस्य पदक पटकविले
चिखली : (एशिया मंच न्यूज ) रांची, झारखंड येथे संपन्न झालेल्या ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेत चिखलीचा सायकलपटू श्रीनिवास अनंता जाधव याने १७ वर्षांखालील वयोगटात कांस्य पदक पटकावून महाराष्ट्राच्या आणि चिखलीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
स्कूल फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे १३ ते १७ जानेवारी दरम्यान रांची येथे ६९ व्या राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातील ठरलेल्या सायकलिंग स्पर्धेत श्रीनिवासने आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत पदक तालिकेत स्थान मिळवले. श्रीनिवास हा चिखली येथील रहिवासी असून त्याचे वडील अनंता जाधव हे चिखली ग्रामीण पाणीपुरवठा विभागात लिपिक पदावर कार्यरत आहेत. श्रीनिवास सध्या क्रीडा पुणे येथील प्रबोधिनीमध्ये सायकलिंगचे खडतर प्रशिक्षण घेत आहे. त्याने मिळवलेले हे यश त्याच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे फळ आहे. आपल्या यशाचे श्रेय तो क्रीडा आयुक्त श्रीमती शीतल तेली-उगले (भा.प्र.से.), क्रीडा प्रबोधिनीच्या प्राचार्या दीपाली पाटील, प्रशिक्षक, दीपाली पाटील, व्यवस्थापक स्वप्नील माने आणि आपल्या आई-वडिलांना दिले आहे.
