नगरसेवक सुनील सपकाळ यांचा तुकोबाराय शेतकरी गटाकडून सन्मान

नगरसेवक सुनील सपकाळ यांचा तुकोबाराय शेतकरी गटाकडून सन्मान

* सपकाळ गुरुजींनी राजकीय चारित्र्य जोपासण्याचे काम केले : नंदुआप्पा
बोरबळे 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         राजकारणात विरोधकांना वैरी समजण्याचा काळ सुरू आहे. अशा वेळी इतरांच्या भावनांचा आदर करून प्रामाणिकते बरोबर साधेपणा जोपासणारे नगरसेवक सुनील सपकाळ खरी राजकीय संस्कृती जोपासत आहे. राजकीय चारित्र्य जोपासणारे ते सच्चे शिलेदार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते व ग्रामपंचायत सदस्य नंदू आप्पा बोरबळे म्हणाले. केळवद येथे तुकोबाराय शेतकरी गटाच्या वतीने नगरसेवक झाल्याबद्दल सुनील सपकाळ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

          कार्यक्रमास अतिथी म्हणून जेष्ठ पत्रकार संजय मोहिते, गणेश निकम, संदीप वानखेडे, बस्सी सर यांची उपस्थिती लाभली. सर्वप्रथम बुलढाणा नगरपालिकेमध्ये स्वीकृत सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तुकोबाराय शेतकरी गटाच्या वतीने गोपाल वाघमारे, श्रीकृष्ण गवते, मनोज उन्हाले ,निलेश पाकारे, डॉक्टर आकाश सदावर्ते, शब्बीर मिस्त्री यांनी शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ सोबतच वैचारिक पुस्तकांची भेट देऊन नगरसेवक सुनील सपकाळ यांचा गौरव केला.
         पुढे बोलताना आप्पाजी म्हणाले, राजकारण बहु आयामी आहे. कोणतीही विचारधारा असो किमान इतरांचा आदर करता आला पाहिजे. ही बेसिक पात्रता व अपेक्षा झाली. आजच्या राजकीय संस्कृतीवर नजर टाकली तर मोठी निराशा होते. राज्याला मोठी राजकीय संस्कृती आहे. याच स्मरण करून द्यावे लागते. अशा वेळी नगरसेवक सुनील सपकाळ आशेचा किरण ठरतात. इतरांच्या भावनांचा आदर त्यांनी नेहमीच केला आहे. वैचारिक भूमिका हा त्यांच्या राजकारणाचा पाया राहिला. राजकीय चारित्र्य जोपासणारे गुरुजी त्यामुळे वेगळे ठरतात असे ते म्हणाले. तर हृदयापासून झालेला सन्मान माझ्यासाठी मोठा असल्याचे सत्कारमूर्ती नगरसेवक सुनील सपकाळ म्हणाले. मातीशी ईमान राखत कळ्या आईच्या साक्षीने केळवद वासियांनी केलेल्या सत्काराबद्दल त्यांनी ऋण व्यक्त केले. यावेळी जेस्ट पत्रकार संजय मोहिते, गणेश निकम, संदीप वानखेडे यांनी विचार व्यक्त केले. संचलन कैलास महामुने,
आभार गोपाल वाघमारे यांनी मानले. यावेळी केळवद ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.