मूकनायक पुरस्कारासाठी प्रदीप जोशी, जमीर शाह यांची निवड
मेहकर : (एशिया मंच न्यूज )
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे देण्यात येणारा मूकनायक पुरस्कार २०२६ साठी मेहकर येथील पत्रकार प्रदीप जोशी व जमीर शहा डोणगाव यांची निवड करण्यात आली आहे.
येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने पत्रकारिता क्षेत्रात अतुलनीय कामगिरी करणाऱ्या दोन पत्रकारांना दरवर्षी मूकनायक पुरस्कार देण्यात येतो. यावेळीही अनेक वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात अतुलनीय योगदान देणाऱ्या पत्रकार प्रदीप जोशी व पत्रकार जमीर शहा यांची पुरस्कार निवड समितीने मूकनायक पुरस्कारासाठी निवड केली आहे वाचनालयाच्या वतीने आयोजित पुरस्कार वितरण समारंभात मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र देऊन या पत्रकारांना सन्मानित करण्यात येणार असल्याचे वाचनालयाचे अध्यक्ष रफिक कुरेशी यांनी एका प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
