सहकार विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांचे सुयश
* विदर्भ विज्ञान उत्सव
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विज्ञान भारती, विदर्भ प्रदेश मंडळ संत गाडगे बाबा, अमरावती विद्यापीठ आणि अशिरा इंग्लिश स्कूल अॅड ज्युनिअर कॉलेज, काळेगावच्या वतीने विदर्भ विज्ञान उत्सव घेण्यात आला. यामध्ये बुलढाणा येथील सहकार विद्या मंदिरचे विद्यार्थी सहभागी झाले होते. विज्ञान मॉडेल, विज्ञान पोस्टर, विज्ञान रांगोळी आणि विज्ञान नाटिका अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये सहकार विद्या मंदिर अॅण्ड ज्युनिअर कॉलेजची नववीची विद्यार्थिनी यशस्वी मालती बडगुजरने विज्ञान पोस्टर स्पर्धेमध्ये पर्यावरणअंतर्गत प्रदूषण या विषयावर प्रथम पारितोषिक मिळविले. तसेच सहकार विद्या मंदिर सीबीएसई आठवीचीचा विद्यार्थी हर्षवर्धन गणेश जायभाये याने विज्ञान मॉडेल आरोग्य विज्ञान या विषयांतर्गत कॅन्सर पेशींच्या
विविध अवस्था यावर मॉडेल
प्रदर्शित करून स्पर्धेत द्वितीय
पारितोषिक मिळविले. तसेच
विज्ञान भारती आणि एनसीइआरटी
यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात
येणाऱ्या विद्यार्थी विज्ञान मंथन या
परीक्षेमध्ये विशेष यश मिळविलेल्या
विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरावरील शिबिराचे आयोजन ४ जानेवारी रोजी सरस्वती भुवन कला आणि वाणिज्य महाविद्यालय, संभाजीनगर येथे केले होते. यामध्ये सहकार विद्या मंदिरचा विद्यार्थी शशांक विलास देवकर याने तृतीय बक्षीस मिळवून यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर व संस्थेच्या अध्यक्षा कोमल झंवर यांनी कौतूक केले.
