कु. रूचिता डाकेची एअर इंडियाच्या केबिन क्रु पदी निवड

 कु. रूचिता डाकेची एअर इंडियाच्या केबिन क्रु पदी निवड
मलकापूर : (एशिया मंच न्यूज )
         शहराची मान उंचावणारी अभिमानास्पद कामगिरी करत कुमारी रुचिता उमेश डाके हिची देशातील नामांकित विमानसेवा कंपनी एअर इंडियामध्ये केबिन क्रू (Cabin Crew) म्हणून निवड झाली आहे. दिल्ली येथे झालेल्या निवड प्रक्रियेत तिची अंतिम निवड झाली असून, कमी वयातच आपल्या ध्येयाला गवसणी घालण्यात तिने यश मिळवले आहे.

        कुमारी रुचिता डाके ही मुळची मलकापूर येथील रहिवासी असून बुलढाणा जिल्ह्यातून एअर इंडियामध्ये निवड झालेल्या मोजक्या उमेदवारांपैकी तिचा समावेश आहे. तिचे प्राथमिक व पुढील शिक्षण मलकापूर येथे झाले असून सध्या ती एलएलबी अभ्यासक्रमाचे  शिक्षण मुंबई येथे घेत आहे. शिक्षणासोबतच विमानसेवेतील करिअर घडवण्याचे स्वप्न तिने जिद्द, मेहनत व शिस्तीच्या जोरावर प्रत्यक्षात आणले आहे.

       रुचिता हिच्या या यशाबद्दल मलकापूर शहरासह संपूर्ण तालुक्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, कुटुंबीय, मित्रपरिवार व नागरिकांकडून तिचे कौतुक केले जात आहे. तिचे हे यश ग्रामीण भागातील तरुण-तरुणींना, विशेषतः मुलींना प्रेरणादायी ठरणारे आहे.