महाराष्ट्र राज्य हज कमिटीच्या सीईओ नियुक्ती रद्द करा
* काँग्रेस अल्पसंख्याक सेलचे निवेदनाद्वारे मागणी
ज. जामोद : (एशिया मंच न्यूज )
महाराष्ट्र कार्यकारी अधिकारी पदावर राज्य हज कमिटीच्या मुख्य गैर-मुस्लिम आयएएस नियुक्तीवर काँग्रेस अधिकारी मनोज जाधव यांच्या अल्पसंख्याक सेल व मुस्लिम समाज, जळगाव जामोद यांनी तीव्र आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सेंट्रल हज कमिटी ऑफ इंडियाच्या नियमांनुसार हज समिती सारख्या धार्मिक स्वरूपाच्या संस्थेतील महत्त्वाच्या पदावर गैर-मुस्लिम व्यक्तीची नियुक्ती करता येत नाही. तसेच सौदी अरेबियाच्या कायद्यानुसार हज काळात मक्का व इतर पवित्र स्थळांमध्ये गैर-मुस्लिमांना प्रवेशास मनाई आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत गैर-मुस्लिम सीईओ कडून जबाबदाऱ्या पार पाडणे व्यवहार्य ठरणार नाही.
सदर नियुक्ती तात्काळ रद्द करून, या संवेदनशील पदावर पात्र व अनुभवी मुस्लिम अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे. जेणेकरून हज यात्रेकरूंच्या धार्मिक भावना आणि प्रशासन दोन्हींचा योग्य सन्मान राखला जाईल. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शेख अय्युब उर्फ बाबू जमादार, गफ्फार मुल्लाजी, आसिफ इक्बाल, अझहर देशमुख, डॉ. शाकीर खान, सय्यद अफरोज, समद जहागिरदार, शेख नासीर, तौफिक सय्यद, हुसेन राही, महमूद खान, गाजी खान, जुनेद शेख, अजीज मिर्झा, इफ्तिखार शाकीर सय्यद, अशरफ खान, सलीम शाह, नवीद शाह, सलमान सर, मुजाहीद खान, सोहेल खान, शेख इम्रान, सय्यद शरीक, मुसद्दिक मोमिन, शाकिर सय्यद, मझर शेख, इफ्तेखार शेख, मोइन सय्यद, कैफ लांजा, शेख नफिज तसेच इतर नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
