* ग्रामस्थांचा गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
तालुक्यातील जांभोरा ग्रामपंचायतच्या हद्दीत गट नंबर 56 मध्ये विदर्भ संस्कृती सीड्स ऍग्रो प्रोडूसर या कंपनीस ग्रामपंचायतच्या दिनांक 19 ऑगस्ट 25 रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत नाहरकत प्रमाणपत्र सर्वांनुमते नाकारले आहे. या कंपनीमुळे या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे, यासाठी या गावातील पाच ग्रामस्थ महिलासह 21 जानेवारी 2026 पासून देऊळगाव राजा येथील गटविकास अधिकारी यांचे कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसलेले आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही त्यामध्ये काही तोडगा निघाला नसल्याचे उपोषण कर्त्यानी सांगितले.
तालुक्यातील जांभोरा या गावातील गट नंबर 56 मध्ये सौ.लता जगन बारवकर यांना ग्रामपंचायतच्या मासिक सभेतविदर्भ संस्कृती ऍग्रो प्रोडूसर ही कंपनी चालण्यासाठी नाहरकत प्रमाण देण्यात आले होते. मात्र सदर नाहरकत प्रमाणपत्र देताना ग्रामस्थांना विचारात घेतले नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला असून दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत या कंपनीला नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, असे ठरले होते व दिलेले नाहरकत प्रमाणपत्र नाकारले होते. मात्र पंचायत समिती स्तरावरून याबाबत काही हालचाली सुरू असल्याच्या कारणामुळे गावकऱ्यांना संशय आला त्यामुळे 21 जानेवारीपासून गटविकास अधिकारी पंचायत समिती यांचे कार्यासमोर भिमाबाई तेजराव कंकाळ, सिंधुबाई गंगाराम सुखदाने, जिजाबाई अश्रुबा मुंडे, साहेबराव बाळाजी खडुळ व दलित शंकर कंकाळ हे आमरण उपोषणाला बसले आहेत. 22 जानेवारी पर्यंत दुसऱ्या दिवशीही यामध्ये काहीच तोडगा निघाला नसल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले. याबाबत गट विकास अधिकारी यांचे सोबत संपर्क साधला असता त्यांनी याबाबत कंपनी बंद करण्याचा अधिकार पंचायत समितीचा नसल्याचे सांगून विशेष प्राधिकरणाकडे याबाबत दाद मागण्याचे त्यांनी सुचविले.
