चोरट्यांचा मोर्चा भगवंतांच्या मंदिराकडे* लाखोचे सोन्या -चांदीचे दागिने लंपास : चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद

चोरट्यांचा मोर्चा भगवंतांच्या मंदिराकडे
* लाखोचे सोन्या -चांदीचे दागिने लंपास :  चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद 
देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
         शहरातील अहिंसा मार्गावर श्री चौंडेश्वरी मंदिराचे बांधकाम सुरू आहे,  हे मंदिर फार प्राचीन असून मुख्य मूर्ती ठेवण्याची जी जागा आहे ती तशीच ठेवण्यात आलेली असून आजूबाजूला भविष्याच्या दृष्टिकोनातून फार मोठे बांधकाम सुरू आहे.  21 जानेवारीचे रात्रीअज्ञात चोरट्याने या मंदिराचे समोरील लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला व मूर्तीवरील चांदीचे मुकुट वजन 100 ग्रॅम कंबरपट्टा चांदीचा वजन 200 ग्रॅम, पांचधातूची देवीची उत्सवाची मूर्ती व पंचधातूची बाळ कृष्णाची मूर्ती व तीन ग्रॅम सोन्याचे मनी मंगळसूत्र असा सोन्या चांदीचे ऐवज चोरून नेण्यात आले, यासोबतच जुना जालना मार्गावरील पुरातन असलेले चतुर्शिंगी देवी मंदिराचे लोखंडी जाळीचा दरवाजा तोडून देवीच्या डोक्यावरील 500 ग्राम वजनाचा चांदीचा मुकुट व दानपेटी वर चोरट्यांनी डल्ला मारला तर याच मंदिराचे अगदी जवळच असलेल्या श्री मारुती मंदिरातील मूर्तीचे चांदीचे डोळे व दानपेटी सुद्धा लंपास केली आहे. 
      यातील चोरटे श्री चौंडेश्वरी मंदिराचे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत. लवकरच या चोरीचा उलगडा होऊन आरोपींना जेरबंद करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक ब्रह्मगिरी यांनी सांगितले. मुख्य मार्गावरील मंदिरात झालेल्या चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गृह विभागात कार्यरत विविध वेगवेगळ्या पथकातील तज्ञांनी भेट देऊन पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यात आली आहे.