महिलांनी विवेकी डोळसपणा स्विकारावा : माधवराव हुडेकर

महिलांनी विवेकी डोळसपणा स्विकारावा  : माधवराव हुडेकर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       महिलांनी आधुनिकीकरण स्वीकारले पाहिजे. शिक्षणासारखे मोठे माध्यम त्यांना आता खुले झाले आहे. महापुरुषांनी केलेल्या प्रयत्नातून महिलांचे जीवन सुखकर झाले आहे. आधुनिकतेची व ज्ञानार्जनाची कास धरण्या सोबत आपण डोळस, विवेकी झाले पाहिजे, असे प्रतिपादन जेस्ट सामाजिक कार्यकर्ते माधवराव हुडेकर यांनी केले. महिला सन्मान आठवड्या निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. 

        शिवसाई परिवार व माणस फाउंडेशन च्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. आठवडाभर महिला सक्षमीकरणाचा जागर घातला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून 22 जानेवारी रोजी सागवान येथे आयोजित कार्यक्रमात हुडेकर यांनी महिलांशी संवाद साधला. कार्यक्रमाचे अध्यक्ष माधवराव हुडेकर होते तर प्रा. डी.एस. लहाने, प्राचार्य शाहीणा पठाण, ज्योती पाटील, प्रतिभा भुतेकर ,मनीषा वारे आनिता कापरे आदींची उपस्थिती होती. 
            पुढे बोलताना हुडेकर म्हणाले,  फुले, शाहू, सावित्रीबाईंनी महिलांसाठी महत्त्वपूर्ण काम केले याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. शिक्षणाची कास आपण धरल्यास आयुष्यामध्ये बदल व्हायला वेळ लागत नाही. अनिष्ट रूढी परंपरा चा सर्वाधिक त्रास महिलांनाच झाला आहे. अनिष्ट रुढीचा त्याग करून आपण कुटुंबात विवेकवाद रुजवावा असे ते म्हणाले . यावेळी प्रा. डी.एस. लहाने यांनी आयोजना मागची भूमिका मांडली तर शाहिनाताई पठाण यांनी अनुरूप विचार व्यक्त केले. संचालन संदीप जाधव यांनी केले.