पत्रकार रहेमत अली शाह यांचा पत्रकार दिनानिमित्त अमोल हिरोळे यांच्याहस्ते सन्मान

पत्रकार रहेमत अली शाह यांचा पत्रकार दिनानिमित्त अमोल हिरोळे यांच्याहस्ते सन्मान 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       येथील पत्रकार भवनात आज ६ जानेवारी रोजी मराठी पत्रकार दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते तथा उद्योजक अमोल हिरोळे यांच्याहस्ते बुलढाणा टाईम्स न्यूजचे संपादक तसेच ‘गुड इव्हिनिंग सिटी’, विदर्भ जगत चे जिल्हाप्रतिनिधी रहेमत अली शाह यांचा भारतीय संविधानाची प्रत व पुष्पगुच्छ देऊन गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला.
          पत्रकारितेच्या माध्यमातून समाजप्रबोधन, लोकशाही मूल्यांचे जतन आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य प्रामाणिकपणे करणाऱ्या पत्रकारांचा गौरव करणे ही काळाची गरज असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले. रहेमत अली शाह यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, आरोग्य, शिक्षण, शेती तसेच नागरिकांच्या समस्या सातत्याने मांडत जनतेचा विश्वास संपादन केला आहे.
          या कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, शिवसेनेचे बुलढाणा नगरपरिषद गटनेते कुणाल गायकवाड, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. कैलास झिने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिरजदार, डॉ. दीपक काटकर, डॉ. अभिलाष माळी, डॉ. प्रज्वल आंबेकर, डॉ. प्रफुल्ल जयस्वाल, आदिती अर्बनचे संस्थापक सुरेश देवकर, पत्रकार कासीम शेख, यांच्यासह आदी पत्रकार बांधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
        रहेमत अली शाह यांनी सत्काराबद्दल आभार व्यक्त करीत उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानत, भविष्यातही समाजहितासाठी, सत्य व निष्पक्ष पत्रकारिता करण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी पत्रकार दिनाचे कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व प्रेरणादायी होते.