दे.राजा : (एशिया मंच न्यूज )
शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित दीनदयाल विद्यालय व कनिष्ठ कला , विज्ञान महाविद्यालय तसेच दीनदयाल ज्ञानपीठ देऊळगाव राजा येथे ३ जानेवारी २०२६ रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे हे होते तर उद्घाटक म्हणून सतीश देवानंद कायंदे सचिव, श्री गजानन महाराज शिक्षण संस्था उंबरखेड यांची उपस्थिती होती. विशेष उपस्थिती मध्ये दादाराव मुसदवाले गटशिक्षणाधिकारी ,पंचायत समिती दे. राजा अरविंद रावजी शिंगणे संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली, गोपालजी बोरा संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली , सहदेवराव सुरडकर संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली तथा दीनदयाल विद्यालयाचे पालक संचालक बाबासाहेब मीनासे संचालक शिक्षण प्रसारक मंडळ चिखली , छबुरावजी भावसार स्थानिक सल्लागार दीनदयाल विद्यालय देऊळगाव राजा, दादा जम्मन व्यवहारे स्थानिक सल्लागार दीनदयाल विद्यालय देऊळगाव राजा , पुरुषोत्तम धन्नावत नगर संघचालक त्र्यंबकराव जायभाये स्थानिक सल्लागार दीनदयाल विद्यालय देऊळगावराजा, रमेश डोईफोडे माजी पर्यवेक्षक दीनदयाल विद्यालय देऊळगाव राजा, सतीश कुलकर्णी सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक, विद्यालयाचे प्राचार्य रामेश्वरजी कुटे व पर्यवेक्षक राजेश भिवटे दीनदयाल ज्ञानपीठ च्या मुख्याध्यापिका विद्याताई ताठे तसेच विद्यार्थी प्रतिनिधी वैभव नामदेव धोंगडे विद्यार्थिनी प्रतिनिधी कु निकिता श्रीनिवास केकान यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम माता सरस्वती व पंडित दीनदयाल उपाध्याय व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रमाता माॅ जिजाऊ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. दवणे मॅडम व विद्यार्थिनी यांनी स्वागत गीत सादर केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्राचार्य रामेश्वरजी कुटे यांनी शाळेची पार्श्वभूमी व वार्षिक स्नेहसंमेलनाची भूमिका व्यक्त केली. उपस्थितांपैकी सतीश कायंदे यांनी उद्घाटक म्हणून आपले मनोगत व्यक्त केले. दादाराव मुसदवाले गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती देऊळगाव राजा यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचे महत्त्व व विद्यार्थ्यांच्या कलागुणांवर प्रकाश टाकला. यानंतर वार्षिक स्नेहसंमेलन उद्घाटन सत्राचे रामकृष्ण दादा शेटे अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळ चिखली यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाचे महत्त्व व वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांची भूमिका याविषयीचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सिद्धेश्वर सरोदे व आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक राजेश भिवटे यांनी केले. शालेय सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी वर्ग ८ ब च्या विद्यार्थिनींनी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अयगिरी नंदिन शिव तांडव नृत्य व वर्ग ७ ब च्या विद्यार्थिनींनी देवा श्री गणेशा हे नृत्य सादर केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते रांगोळी व चित्रकला प्रदर्शनेचे उद्घाटन पार पडले.
