अंध दिव्यांग व कर्णबधिर विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत यश
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
स्थानिक दिव्यांग कल्याण व पुनर्वसन संस्थेअंतर्गत कार्यरत असलेल्या अंध, अपंग आणि कर्णबधिर विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी मंगळवार ३० डिसेंबर २०२५ रोजी खामगाव येथील कर्णबधिर विद्यालय यांनी आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये यश मिळविले.
सुरूवातीला दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी इंडोले यांच्याहस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी खामगाव येथील लायन्स क्लबचे अनेक पदाधिकारी कार्यक्रमांमध्ये हजर होते. जिल्हाभरातून अनेक दिव्यांनी शाळा या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्या होत्या. दिव्यांग विद्यार्थ्यांचे १०० मीटर धावणे, लांब उडी, भराभर चालणे, गोळा फेक, बादलीत बॉल, लगोरी फोड, नृत्य स्पर्धा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले होते. एक दिवसीय क्रीडा स्पर्धेमध्ये बुलढाणा येथील अपंग विद्यालयाने नऊ गोल्ड मेडल मिळवले, कर्णबधिर विद्यालयाने पाच गोल्ड मेडल मिळवले आणि अंध निवासी विद्यालयाने बारा गोल्ड मेडल मिळवले. त्यामुळे पुढील महिन्यात होणाऱ्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये या खेळाडूंची निवड झाली.
या यशाबद्दल अपंग कल्याण व पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष डॉ. छाजेड, उपाध्यक्ष कारंजकर, सचिव जयसिंग जयवार, कोषाध्यक्षा सुरेखा जतकर इत्यादी मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले. यावेळी क्रीडा शिक्षक मवाळ, साखळीकर, ठाकरे यासोबत अनेकांनी मेहनत घेतली. विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय हे आपले मुख्याध्यापक विजय डव्हळे, रमेश आराख, प्रिया माळी यांना देतात.
