बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचा आठवा वर्धापन दिन बुलढाणा येथील स्थानिक गर्देहॉल येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून उपस्थित मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कंकाळ संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाळासाहेब आढागळे यांनी भारतीय संविधान व उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. त्यानंतर राज्य सचिव दत्ता मुजमुले यांनी संघाच्या आठ वर्षांच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडला.
या कार्यक्रमाला उद्घाटक बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकारांच्या सामाजिक आर्थिक शैक्षणिक व सुरक्षिततेशी संबंधित मागण्यांचे निवेदन आमदार संजय गायकवाड यांना सादर करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार संजय गायकवाड यांनी पत्रकारांच्या प्रश्नांसाठी अधिवेशनात ठोस पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी व्हिडिओद्वारे शुभेच्छा दिल्या तसेच संघाचे कार्य महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात सुरू असल्याबद्दल राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ, संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी व सर्व पत्रकारांचे कौतुक केले.
संघाचे सल्लागार डॉ सुरेंद्र शिंदे यांनी पुरोगामी विचारधारेवर संघ कार्यरत असल्याचे सांगितले. राज्य कार्याध्यक्ष शंकरशिंग ठाकूर यांनी संघ हा सर्व पत्रकारांचा असून एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार रणजितसिंग राजपूत यांनी पुरोगामी विचारधारा देशाला दिशा देणारी असल्याचे मत व्यक्त केले. राजेंद्र काळे यांनी पत्रकारांना मार्गदर्शन केले.
संजय गाडेकर यांनी पत्रकारांची गरिमा याबद्दल सांगितले. डी. एस. लहाने यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाला उपस्थित पत्रकार बांधव प्रतापराव मोरे, विलास खंडेराव, शेख इद्रिस, भास्कर इंगळे, मिलिंद वानखेडे, विश्वास कंकाळ, दादाराव वानखेडे, सक्षम कंकाळ, कुसुमबाई वानखेडे, स्वाती कंकाळ, आद्या कंकाळ, धीरज गवई, आशिष गवई, विजय अंभोरे, दिनकर गवई, अजय जाधव, भागवत दाभाडे, सूत्रसंचालन अभिषेक वरपे, कुसूमबाई वानखेडे यांनी केले. तर अध्यक्षीय भाषणात संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी यांनी संघाचा 2017 ते 2025 या कालावधीतील प्रवास संघर्षातून यशाकडे गेलेला असल्याचे सांगून या कार्यक्रमास आमदार संजय गायकवाड, विजय सूर्यवंशी, बाळासाहेब आढागळे, सुभाष बिंदवाल, विनोद पवार, प्रवीण परमार, विष्णू कंकाळ, मारुती शिखरे, दत्ता पाटील, प्रमिला आढागळे, मनोज मोडक, हंसराज बाबा वाघ, सरोज पवार, राजपाल शेगोकार, सचिन गायकवाड, अश्विनी ठाकूर, प्रवीण नाईक, अलंकार कडू, बाळाराम सावंत, संतोष ठाकूर, निर्णय पाटील, श्रावण पाटील, हिरादास सोनावले, विलास सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील अनेक पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी राज्याध्यक्ष विष्णू कंकाळ यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
