आमदार मनोज कायदे यांच्या जनता दरबारात ऑन द स्पॉट फैसला

आमदार मनोज कायदे यांच्या जनता दरबारात ऑन द स्पॉट फैसला
*  नागरिकांचे प्रशासनाकडे असलेल्या प्रलंबित प्रश्नांना जनता दरबाराने फोडली वाचा
 देऊळगाव राजा : (एशिया मंच न्यूज )
             सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघाचे आमदार म्हणून नव्हे तर कामदार म्हणून जनतेच्या सेवेत स्वतःला अर्पण करून घेणारे मनोज देवानंद कायदे यांनी मतदार संघात सर्वांगीण विकासा बरोबरच जनतेचे प्रशासनाकडे प्रलंबित असलेल्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी जनता दरबाराचे 9 जानेवारी 2026 रोजी स्थानिक विश्रामगृहावर आमदार मनोज कायंदे यांनी जनता दरबाराचे आयोजन केले होते.  याच जनता दरबारात ऑन द स्पॉट फैसला प्रमाणे अनेकांचे अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे प्रलंबित प्रश्न सोडण्यात आले.  एका हातात त्या नागरिकांच्या कामाचे निवेदन व दुसऱ्या हाताने मोबाईल वरून संबंधित अधिकाऱ्यास त्या कामाबाबत विचारणा व तात्काळ काम करण्याची सूचनामुळे अनेक नागरिकांचे या जनता दरबारात काम झाल्यामुळे नागरिक खुश झाल्याचे यावेळी दिसून आले. तर वयोवृद्ध यांचे मुखातून आमदार असावा तर असा असे शब्द बाहेर पडताना एकावयास मिळाले.
            सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघातील जनतेने गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मनोज देवानंद कायंदे  यांना आमदारकी हे पद बहाल करून जनतेची सेवा करण्यासाठी विधानसभेत पाठवले आमदार मनोज कायंदे यांनी जनतेने जो विश्वास दाखवला तो सार्थ ठरवण्यासाठी व मतदार संघाच्या चौफेर विकासासाठी नियोजनबद्ध प्रस्ताव तयार करून त्यास टप्प्याटप्प्याने मान्यता आणण्याचे कामाला सुरुवात केली आहे.  ही कामे सुरू असतानाच मतदार संघातील अनेक नागरिकांची कामे प्रशासनाच्या लालफित शाहीत अडकल्यामुळे प्रलंबित होती. ही बाब हेरून त्यांनी नियमितपणे जनता दरबाराच्या आयोजनास सुरुवात केली.  ऑन द स्पॉट फैसला होण्यासाठी संबंधित प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून ते प्रश्न निकाली काढण्याचे काम सुरू केले आहे.  9 जानेवारी 2026 रोजी स्थानिक विश्रामगृहावर मतदार संघातील शेकडो नागरिक आपल्या वेगवेगळ्या समस्या घेऊन त्यांचे जनता दरबारात दाखल झाले, त्यांनी प्रत्येक नागरिकांची आस्थेवाईकपणे  चौकशी करून त्यांच्या असलेल्या कामाबाबत संबंधित यंत्रणा प्रमुखांना सूचना देऊन प्रलंबित असलेले कामे तात्काळ निकाली काढण्यात आले. 
         यावेळी इरफान अली, भगवान मुंढे , गणेश डोईफोडे, नगरसेवक विष्णू झोरे, भगवानराव खरात, हाजी सिद्दीक हाजी उस्मान, निशिकांत भावसार, धनशीराम शिपणे, प्रा. दिलीप झोटे, प्रकाश गीते, सदाशिव मुंढे, गजानन काकड, विष्णू बोंद्रे, ज्ञानेश्वर टेकाळे उपस्थित होते.