मॉं जिजाऊंना मानवंदना ; बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे व्याख्यानाचे आयोजन

मॉं जिजाऊंना मानवंदना ; बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे व्याख्यानाचे आयोजन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे बीज रोवून संपूर्ण जगाला दोन-दोन छत्रपती देणार्‍या राष्ट्रमाता मॉं जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने ‘मॉं जिजाऊंना मानवंदना’ या कार्यक्रमाचे आयोजन ११ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता पत्रकार भवन बुलढाणा येथे करण्यात आले आहे. या निमित्ताने व्याख्यान कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. 
         या कार्यक्रमात प्रा. प्रमोद टाले इतिहास संशोधक तथा जिल्हा एड्स नियंत्रण कार्यक्रम अधिकारी हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करणार आहेत. तर राजेश डिडोळकर समन्वयक, पत्रकार विरोधी हल्ला कृती समिती यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय प्रा.सुभाष लहाने राज्य उपाध्यक्ष, असोसिएशन ऑफ स्मॉल ऍण्ड मिडीयम न्यूज पेपर, रविंद्र गणेशे उपाध्यक्ष, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रणजीतसिंग राजपूत अध्यक्ष, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ, सूत्रसंचलन राम हिंगे शहराध्यक्ष, बुलढाणा जिल्हा पत्रकार संघ करणार आहेत.
       यावेळी बुलढाणा नगरपरिषदे मधील स्वीकृत नगरसेवकांचा विशेष सन्मान करण्यात येणार असून, त्यामध्ये उदय देशपांडे, प्रा.सुनिल सपकाळ व मोहन पर्‍हाड यांचा समावेश आहे. कार्यक्रमास सर्व पत्रकार बांधव, जिजाऊ प्रेमींनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा पत्रकार संघ, बुलढाणा यांच्यावतीने करण्यात आले आहे.