* जिजामाता महाविद्यालयातील विद्यार्थिनींना पुरस्कार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
एग्रिकल्चर ट्रस्ट बारामती व शारदाबाई पवार आर्ट्स अँड कॉमर्स महिला महाविद्यालय बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने ४ ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित १३ व्या स्वयंसिद्धा युवती संमेलनात जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथील कु. श्रुती तायडे, कु. पौर्णिमा सोळंके या दोन विद्यार्थिनींनी प्राचार्य डॉ. नितीन चांगोले यांचे मार्गदर्शनात महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व केले.
हे स्वयंसिद्धा संमेलन एग्रिकल्चर ट्रस्ट संस्थेच्या सचिव सौ. सुनंदा पवार, सामाजिक कार्यकर्त्या सौ. सविता व्होरा, यशवंत शितोळे यांचे मार्गदर्शनात आयोजित करण्यात आले होते. या संमेलनादरम्यान या उपक्रमाशिवाय सहभागी युवतींच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विविध विषयावरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.
या संमेलनात महाराष्ट्रातील १७० महाविद्यालयातील १३०० विद्यार्थिनींनी सहभाग घेतला होता. यात श्री. शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचालित बुलडाणा, चिखली, नांदुरा, मोताळा या चार महाविद्यालयांनी आपल्या विद्यार्थिनींना सहभागासाठी प्रोत्साहित केले होते. सहभागी विद्यार्थिनींना श्री शिवाजी महाविद्यालय मोताळा येथील प्रा. डॉ. चित्रा मोरे यांनी मार्गदर्शन केले.
या संमेलनात " माझे महाविद्यालय : आमचा सर्वोत्कृष्ट उपक्रम " मी " युथ आयकॉन " या अनुषंगाने सादरीकरण केले.
जिजामाता महाविद्यालय बुलडाणा येथे विद्यार्थ्यांना मानसीक ताणतणावला सहज सामोरे जाता यावे , तसेच विद्यार्थ्यांनी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आपले मित्र समजुन त्यांनी सहजपणे आपल्या समस्या सांगाव्यात व त्यांच्या व्यक्तिमत्व विकासास चालना मिळावी या हेतुने
" मानसरंग क्लब " प्रा. डॉ. सुबोध चिंचोले, प्रा. डॉ. विकास पहूरकर, प्रा. डॉ. राजेश्री येवले, प्रा. रामेश्वर बनकर, प्रा. मृणालिनी सपकाळ यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे. त्यामुळे हा उपक्रम महाविद्यालयात आपल्या कार्यामुळे प्रसिद्ध आहे. कु. श्रुती तायडे व कु. पौर्णिमा सोळंके या विद्यार्थिनींनी " माझे महाविद्यालय: आमच्या महाविद्यालयातील उत्कृष्ट उपक्रम " विद्यार्थी सादरीकरणात " मानसरंग क्लब " द्वारे आयोजित उपक्रमाबाबत उत्कृष्ट सादरीकरण केले.
स्पर्धेच्या परीक्षकांना महाविद्यालयातील हा उपक्रम आवडला व जिजामाता महाविद्यालयास अनेक सहभागी महाविद्यालयातून उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त झाला. त्याबद्दल प्राचार्य. डॉ. नितीन चांगोले , प्रा.डॉ. सुबोध चिंचोले, प्रा. डॉ. सुरेश गवई, प्रा.डॉ. गणेश किरोचे, प्रा .डॉ. जे. जे. जाधव, प्रा. डॉ. अनंत मोरे , प्रा. डॉ. विकास पहूरकर, प्रा. रामेश्वर बनकर, प्रा. लेफ्टनंट पवन ठाकरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. यासाठी विद्यार्थिनींना प्रा. डॉ. सुबोध चिंचोले, प्रा. डॉ. जे. जे. जाधव यांनी सहभागासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन केले.
