संक्रांतीला विधवा महिलांना वाण देण्यासाठी प्रवृत्त करा : प्रा. डी.एस. लहाने
* जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने विधवांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करावे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
मकर संक्रांतीला महिला एकमेकींना पतीचे नाव घेऊन वान देतात. वान हे भरभराटी चे प्रतीक आहे. विधवा महिला सुद्धा पतीच्या निधनानंतर त्याच्याच नावाने जीवन जगत असतात, त्यामुळे विधवा महिलांनाही मकर संक्रांत मध्ये वान देण्यासाठी सहभागी करून घ्यावे, तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने नव विचार देणारे हळदी, कुंकू व वाण देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे. मानस फाउंडेशन च्या वतीने अशा ग्रामपंचायतींना साहित्य व भेटवस्तू पुरविल्या जाणार आहे.
संक्रातीला महिलांमध्ये एकमेकींना वान देण्याची प्रथा आहे. यामध्ये धान्य, शेतात निर्माण होणारी फळे व भेटवस्तू दिल्या जातात. मात्र हे करीत असताना विधवा महिलांना यामध्ये सहभागी करून घेतले जात नाही. कुठल्याही समारंभापासून विधवांना दूर ठेवण्याचा कल राहिला आहे. हा भेद कायम पाळला जातो.
वास्तविक पाहता मृत पती च्या मागे विधवा महिला पाठीमागे त्याचे नाव लावून जीवनकंठत असते. त्याच्या नावावर जगणारी "तीला" कुटुंब, समाजातून मानसन्मान नक्कीच मिळाला पाहिजे. त्यासाठी त्यांना वान देण्यासाठी प्रवृत्त केले पाहिजे. पतीच्या नावापूर्वी दिवंगत किंवा स्वर्गीय शब्द लाऊन त्या सुद्धा वानदेऊ शकतात. मागील वर्षी मानस फाऊंडेशन ने हा उपक्रम राबवला होता. अनेक विधवा महिलानी त्यामध्ये सहभागी होऊन वान दिले होते. विधवांना सन्मानाने जगता यावे, यासाठी मानस फाउंडेशन चळवळ उभी केली आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम देखील राबवले जातात. यंदाच्या संक्रांतीमध्ये महिला वर्ग तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करावे, त्यात विधवा भगिनींना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन मानस फाउंडेशनचे अध्यक्ष प्रा. डी.एस. लहाने यांनी केले आहे.
* उपक्रम छोटा..संदेश मोठा :
संक्रातला तिळगुळ घ्या.. गोड बोला म्हणून संदेश देतात. या दिवशी विधवा बहिणींना सन्मान देण्यासाठी जर आपण धार्मिक असाल तर देवळामध्ये, घरातल्या देव्हाऱ्यात तिच्या हस्ते दिवा लावा. त्यांच्याहस्ते देवाला नैवेद्य दाखवा. तिला हळदीकुंकू कार्यक्रमांमध्ये सहभागी करून घ्या. त्यांना तिळगुळ द्या आणि एक छोटी किमतीची वस्तू वाण म्हणून द्या. यासाठी फाऊंडेशंकडून मदत केली जाईल. ज्या महिला पहिल्यांदा या उपक्रमामध्ये सहभागी होतील त्यांचा सन्मान होईल. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणि आनंद समाधान दिसेल. अनिष्ट विधवा प्रथे च्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी हे छोटे उपक्रम नक्कीच उपयोगी पडतील, असे प्रा.लहाने यांनी म्हटले आहे.
