सिंदखेडराजा : (एशिया मंच न्यूज )
बावनबुरजी बचाव कृती समितीच्या वतीने शिवरायांची सासुरवाडी करवंड येथे भव्य करवंड महोत्सवाचे आयोजन केले आहे. दरम्यान आज कृती समितीचे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील व सहकार्यानी जिजाऊ चरणी मातृतीर्थावर माथा टेकला. आई जिजाऊ महोत्सवाचे शिवधनुष्य पेलण्याचे बळ दे, असे साकडे यावेळी सुनील जवंजाळ यांनी जिजाऊ चरणी घातले.
बुलढाणा जिल्ह्यामध्ये इतिहास घडला मात्र तो लिहिल्या गेला नाही. शिवरायांची सासरवाडी असणारे करवंड गाव त्यामुळे उपेक्षित राहिले. इंगळे घराण्यातील दोन मुली छत्रपती घराण्यात देण्यात आल्या होत्या. त्यातील एक गुणवंतबाई ह्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पत्नी होत्या. बावन बुरुज असल्याने या गावाला 52 बुरजी असे म्हटले गेले. आजही येथे भव्य राजवाडा, तटबंदी, मंदिर आहे. मात्र हे सर्व इतिहासाचे अवशेष भग्न स्थितीमध्ये असून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. हा ऐतिहासिक ठेवा जपला जावा यासाठी करवंड महोत्सवाची संकल्पना सुनील जवंजाळ पाटील यांनी मांडली. त्याला प्राचार्य अरविंद बापू देशमुख, गणेश निकम, आण्णासाहेब म्हणसणे यांनी प्रतिसाद दिला. सरदार घराण्यातील हरीरुद्र राजे सध्या करवंड निवासी आहेत. त्यांनी देखील या महोत्सवामध्ये हिरिरीने सहभाग घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वात महोत्सव पुढे जात आहे. नुकतीच याबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक करवंड या गावी पार पडली. यामध्ये समाजाच्या विविध घटकातील बहुसंख्य मान्यवर उपस्थित झाले होते. 12 जानेवारी रोजी जिजाऊ साहेबांची जयंती असल्याने आई जिजाऊ हे शिवधनुष्य पेलण्याचे बळ दे, असे म्हणतात संकल्पक सुनील जवंजाळ पाटील व सहकाऱ्यांनी पूर्वसंध्येला मातृतिर्धावर जाऊन माथा टेकला.
15 एप्रिल रोजी करवंड येथे भव्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आहे. यावेळी प्रा. दिलीपराव नाईकवाड, विजयराव देशमुख, नारायणराव मिसाळ, एकनाथराव राजे जाधव, शिवाजीराव खरात, गणेशराव राजे जाधव, वाल्मीक सुराशे, मुकुंद दंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
