शिवसाई यूनिवर्सल ज्युनिअर कॉलेजच्या
* अद्वैत घुगेने राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत कांस्य पदक पटकावले
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धा क्रीडा व युवक सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य , पुणे यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने 22, 23 डिसेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले होते. 19 वर्षं वयोगटात शिवसाई यूनिवर्सल ज्युनिअर कॉलेज कोलवड , बुलडाणा चा अद्वैत घुगे या विद्यार्थ्याने अमरावती विभागाचे प्रतिनिधित्व करत सहभाग नोंदविला. यात उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक पटकावले.
शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या 5% क्रीडा सवलतीसाठी पात्र ठरला आहे. त्याच्या या कामगिरीचे शिवसाई यूनिवर्सल lचे संचालक प्रा. डी. एस. लहाने सर यांनी अभिनंदन केले. आपल्या यशाचे श्रेय त्यानी त्याचे प्रशिक्षक चंद्रकांत इलग सर व क्रीडा शिक्षक सागर उबाळे यांना देतो.
अद्वैत घुगे याने यापूर्वीही अनेक स्पर्धांतून आपले आर्चरी कौशल्य दाखवून दिले आहे. शिवसाई यूनिवर्सल मध्ये अभ्यासा सोबत विद्यार्थ्यांचे क्रीडा गुणांना ही वाव दिला जातो. प्राचार्य डॉ. सुनील दाभाडकर, प्रमोद मोहरकर यांनीही अद्वैत घुगे यांच्या क्रीडा गुणांचे कौतुक केले.
