विदर्भ महाविद्यालय बुलढाणाचे वार्षिक स्नेहसंमेलन उ‌द्घाटन संपन्न* समाज माध्यमावर प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कलेचा आनंद घ्या : प्रा. डॉ. कैलास पवार


विदर्भ महाविद्यालय बुलढाणाचे वार्षिक स्नेहसंमेलन उ‌द्घाटन संपन्न
* समाज माध्यमावर प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कलेचा आनंद घ्या : प्रा. डॉ. कैलास पवार
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
         स्थानिक विदर्भ महाविद्यालय बुलढाणा येथे  2 जानेवारी 2026 रोजी विदर्भ महाविद्यालयाच्या 'वार्षिक स्नेहसंमेलनाचे' उ‌द्घाटन पार पडले. या कार्यक्रमाचे उद्घाटक मराठी चित्रपट सृष्टीतील सशक्त चेहरा नाळ, झुंड, बंदूक, बिर्याणी यासारख्या गाजलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे चित्रपट अभिनेते  गणेश देशमुख , प्रमुख उपस्थिती राजेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. कैलासराव के. पवार , सहसचिव प्रा. डॉ. संगीताताई के. पवार मॅडम, प्रमुख पाहुणे म्हणून मराठी रंगभूमीला नवीन विचार देणारे सुप्रसिद्ध नट, लेखक व दिग्दर्शक शशिकांत इंगळे व प्रसिद्ध नाट्य लेखक व दिग्दर्शक विजय सोनुने, प्राचार्य, डॉ. गोविंद गायकी होते.
          समाज माध्यमावर प्रदर्शन करण्यापेक्षा प्रत्यक्ष कलेचा आनंद घ्या असा संदेश विद्यार्थ्यांना राजेशवर एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्रा. डॉ. कैलास राव के पवार सर यांनी दिला. तर शशिकांत इंगळे यांनी कला मानसिक संस्कार करते कलेकडे सकारात्मक दृष्टीने बघितले पाहिजे कलाच माणसाला नाव मिळवून देते, असे विचार व्यक्त केले. तर विजय सोनुने यांनी खरी कला म्हणजे जी प्रत्यक्ष सादर केली जाते ती,  असे मत व्यक्त करून मोबाईल संस्कृतीमुळे होणारा कला व सुरजनशीलतेचा ऱ्हास याविषयी चिंता व्यक्त केली.                      कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोविंद गायकी सर यांनी शाळा, महाविद्यालयातील स्नेहसंमेलनात कला सादरीकरणाची संधी मिळाली म्हणून मी घडलो' असे विचार व्यक्त केले. स्नेहसंमेलन उ‌द्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाच्या संयोजिका प्रा. सीमा काळणे (सोनोने) मॅडम यांनी तर सूत्रसंचालन डॉ. लक्ष्मण शिराळे सर यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमाला वि‌द्यार्थी उपस्थित होते.