यशप्राप्तीसाठी परिश्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे - प्राचार्य डॉ.गावंडे

यशप्राप्तीसाठी परिश्रम व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे - प्राचार्य डॉ.गावंडे
चिखली : (एशिया मंच न्यूज )
    स्व. भास्करराव शिंगणे कला प्रा. नारायणराव गावंडे विज्ञान व आशालता गावंडे वाणिज्य महाविद्यालयात गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते शेखर बोंद्रे महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागचे प्रमुख डॉ. परमेश्वर गायकवाड व गणित विभाग प्रमुख डॉ. चंद्रकांत खोद्रे उपस्थित होते.

       संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या उन्हाळी २०२५ च्या परीक्षेमध्ये पदव्युत्तर गणित विभागाच्या सहा विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले. त्यामुळे गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त करण्याची महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या यशाची परंपरा यावर्षी सुद्धा कायम ठेवली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निलेश गावंडे यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करतांना मागील पाच वर्षात महाविद्यालयाच्या गणित विभागाच्या एकूण चौतीस विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केले आहे. 
       ग्रामीण भागातील महाविद्यालयासाठी ही बाब गौरवास्पद असून महाविद्यालयाचा नावलौकिक वाढविणारी आहे. गुणवत्ता यादीमध्ये स्थान प्राप्त विद्यार्थ्यांचा आदर्श अन्य विद्यार्थ्यांनी घ्यावा असे म्हणून यशप्राप्तीसाठी मेहनत, सातत्य व शिक्षकांचे मार्गदर्शन महत्त्वाचे आहे. भविष्यातही अशाच प्रकारे उज्वल यश संपादन करून महाविद्यालयाचे व आई वडिलांचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा स्मुतीचीन्ह, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये देवांग धीरज देशमुख (पहिला मेरिट), कु. प्राजक्ता अंबादास शेटे (दुसरी मेरिट), कु. नेहा कैलास चोपडा (पाचवी मेरिट), कु. पूजा भानुदास मोरे (सहावी मेरीट) कु. कोमल कैलास देशमुख (सातवी मेरिट) कु. धनश्री संजय तांगडे (नववी मेरिट) यांचा समावेश आहे. गुणवत्ता यादीत स्थान प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय प्राचार्य डॉ. निलेश गावंडे तसेच गणित विभागप्रमुख डॉ. चंद्रकांत खोद्रे यांना दिले आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. चंद्रकांत खोद्रे यांनी केले सूत्रसंचालन डॉ. निलेश तले यांनी केले तर आभार डॉ. प्रवीण शिम्बरे यांनी मानले.