धाड : (एशिया मंच न्यूज )
म्हसला खुर्द येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ३ जानेवारी रोजी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
अध्यक्षस्थानी उपप्राचार्य किरण मस्के होत्या; तर स्वाती सोनुने, कल्याणी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. सावित्रीबाई फुलेंच्या वेशभूषेतील विद्यार्थिनी कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या. कार्यक्रमात सावित्रीच्या जीवनावरील भाषण आणि गाणी सादर करण्यात आले. मुख्याध्यापक सचिन इंगळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला. शिक्षिका सोनुने यांनी सावित्रीमाईंच्या संघर्षमय जीवनाबाबत माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात किरण म्हस्के यांनी एकीच्या बळाचे उदाहरण देत मार्गदर्शन केले. शिक्षिका काटकर यांनी संचालन केले. आभार साखरे यांनी मानले. संस्थापक संदीपदादा शेळके, मालतीताई शेळके यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
