मकर संक्रांतीनिमित्त दिशा महिला बचतगट फेडरेशनतर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात

मकर संक्रांतीनिमित्त दिशा महिला बचतगट फेडरेशनतर्फे हळदी-कुंकू समारंभ उत्साहात 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर महिलांमधील आपुलकी, स्नेह आणि सामाजिक ऐक्य वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या वतीने हळदी-कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा समारंभ शनिवार २४ जानेवारी २०२६ रोजी राजर्षी टॉवर समोर, चिखली रोड, सुंदरखेड, बुलढाणा येथे सायंकाळी ५ ते ८ या वेळेत अत्यंत आनंदी व उत्साही वातावरणात पार पडला.

          या कार्यक्रमास दिशा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा ॲड. जयश्रीताई शेळके या प्रमुख उपस्थित होत्या. फेडरेशनच्या वतीने महिलांमध्ये सामाजिक सलोखा, परंपरेचे जतन व सशक्तीकरणाच्या हेतूने हा उपक्रम दरवर्षी नियमितपणे साजरा करण्यात येतो.
         यावेळी बोलताना ॲड. जयश्रीताई शेळके म्हणाल्या की, “हळदी-कुंकू हा केवळ एक सण नसून महिलांना एकत्र आणणारा, नात्यांमध्ये गोडवा निर्माण करणारा आणि आत्मविश्वास वाढवणारा उत्सव आहे. महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहत आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, परस्पर सहकार्याने पुढे जावे आणि आपल्या संस्कृतीच्या मूल्यांना जपावे, असा संदेश त्यांनी दिला.

           या समारंभासाठी बुलढाणा शहरातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवर महिलांची ही उपस्थिती होती. बुलढाणा शहरातील असंख्य महिलांनी या हळदीकुंकू समारंभाला भेट दिली. पारंपरिक वेशभूषा, हळदी-कुंकू आणि स्नेहपूर्ण संवादामुळे संपूर्ण वातावरण भारावून गेले होते. महिलांनी एकमेकींना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देत कार्यक्रमाचा आनंद घेतला.

         या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशन, राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्था मर्यादित, शिरपूर (र. नं. ३३३) तसेच दिशा महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित, बुलढाणा (र. नं. ३७५) च्या कर्मचारी स्मिता वराडे, संगीता सोनूने, कविता भागिले, सोनाली वाघ, अश्विनी फदाट, राधिका शिरसाट, स्वाती जाधव, शालिनी जाधव, मीना इंगळे, वंदना मेढे, उषा साळोक, जयश्री राऊत, रूपाली इंगळे, ज्योती नरवाडे, प्रतिभा तायडे, पल्लवी पाटील, सरला कदम, सीमा देशमुख, दिपाली राजपूत, पूजा लवंगे, पूजा शेळके, जयश्री कासवत, मनीषा चाटे, अर्चना चव्हाण, उज्वला मोहिते, आम्रपाली कांकाळ, रूपाली उबरांहांडे, सपना इंगळे, शितल सुरडकर, भारती कोल्हे, उज्वला आसने, सरला बीचकुळे, निशा हिवाळे, सविता अहिरे, शालिनी खराटे, मयुरी शिंदे, दिव्या तारोने, कीर्ती परिहार, दिपाली राजपूत यांचे मोलाचे सहकार्य लाभले.