दहावी, बारावीनंतर पुढे काय?
* म्हसला खुर्द येथील जिजाऊ ज्ञानमंदिरमध्ये मंगळवारी करिअरविषयक परिसंवाद
धाड : (एशिया मंच न्यूज )
म्हसला खुर्द येथील जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल& ज्युनिअर कॉलेजमध्ये २७ जानेवारी रोजी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन परिसंवाद हा अभिनव शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
दहावी व बारावीच्या परीक्षेला सामोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना हा परिसंवाद मार्गदर्शक ठरणार आहे. दहावी, बारावीनंतर पुढे काय? याबाबत शिक्षण व अर्थशास्त्राचे अभ्यासक तुषार डोडिया मार्गदर्शन करणार आहेत. राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संदीप शेळके यांच्या अध्यक्षतेत हा परिसंवाद होणार आहे. यावेळी राजर्षी शाहू ट्रस्टचे संस्थापक भाऊसाहेब शेळके, ठाणेदार प्रताप भोस, चांडोळचे गटप्रमुख सचिन तातू, राजर्षी शाहू कॉलेजचे अध्यक्ष नंदाराम काळे, डीबीडी स्कूलचे प्राचार्य संतोष डवले, घोरपडे स्कूलचे प्राचार्य अमोल घोरपडे, सहकार विद्या मंदिरचे प्राचार्य सचिन राजपूत, सुनील बिलारी, कलाबाई स्कूलचे शेख रफिक, अस्मिता ऍग्रोचे सीएमडी नितीन उबाळे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. विद्यार्थ्यांनी परिसंवादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राचार्या किरण म्हस्के यांनी केले आहे.
