शिरपूर येथे 3200 पदांसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन
* जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा : शिवाजी तायडे
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज ) माँ जिजाऊ चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने शिरपूर येथे रविवार 18 जानेवारी 2026 रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळाव्यात 3200 विविध पदांसाठी विविध कंपन्यांकडून भरती केली जाणार असून या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्याहस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात, नगर परिषद बुलढाणाचे गटनेता मृत्यूंजय गायकवाड, जिल्हा कौशल्य विभागचे सहाय्यक आयुक्त गणेश बिटोडे हे उपस्थित राहणार आहेत. याशिवाय शिरपूर सरपंच सौ. लक्ष्मीबाई सुसर, साखळीच्या सरपंच सौ. सुनिताताई भगत, येळगांव सरपंच दादाराव लवकर, साखळी खुर्द सरपंच पंडीत हिवाळे, अजीसपुर सरपंच सौ. संध्याताई जगताप आदी मान्यवर मेळाव्यात प्रामुख्याने उपस्थित असतील.
सदर मेळावा अनेक बेरोजगार युवक-युवतींच्या आयुष्याला नवी दिशा देणारा आणि जीवनाला आर्थिकदृष्ट्या स्थिर करणारा ठरू शकतो, म्हणून मोठ्या संख्येने या भव्य रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन माँ जिजाऊ चॅरिटेबल फाऊंडेशनचे अध्यक्ष शिवाजी तायडे, सचिव सौ. सरला शिवाजी तायडे यांनी केले आहे.
