इकबाल नगर, मिर्झा नगर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित * अतिरिक्त नवीन DP उभारून द्या* पत्रकार वसीम शेख अनवर यांची विद्युत वितरण कंपनीकडे मांगणी

 इकबाल नगर, मिर्झा नगर परिसरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित 
* अतिरिक्त नवीन DP उभारून द्या
* पत्रकार वसीम शेख अनवर यांची विद्युत वितरण कंपनीकडे मांगणी
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      शहरातील मिर्झा नगर, इकबाल नगर परिसरातील वारंवार विद्युत खंडित होणाऱ्या त्रासाला दूर करण्यासाठी अतिरिक्त DP बसवण्याची मांगणी वसीम शेख पत्रकार यांनी एका निवेदनाद्वारे आज 26 डिसेंबर रोजी विद्युत वितरण कंपनीचे बुलढाणा विभागाचे उप कार्यकारी कार्यकारी अभियंता व साहाय्यक अभियंता यांकडे केली आहे. निवेदनावर अतिरिक्त DP बसवण्यासंदर्भात वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे आश्वासन साहाय्यक अभियंता देशपांडे यांनी वसीम शेख अनवर यांना दिले आहेत.
         बुलढाणा शहरातील मिर्झा नगर येथील स्व. हाजी सै. उस्मान सै. मन्नू डोंगरे उर्दू शाळेजवळील विद्युत DP वर मिर्झा नगर व इकबाल नगर भागातील असंख्य नागरिकांना विद्युत प्रवाह करण्यात येते, मात्र या परिसरात वारंवार विद्युत खंडीत होण्याचा त्रास नागरिकांना सोसावा लागतो, विशेष म्हणजे शुक्रवारी नमाजच्या दिवशी विद्युतचा जास्त लोड आल्याने DP कमी क्षमतेची असल्याने डीपीवरचे वारंवार फ्यूज किंवा डीव जळल्याने वीज खंडित होत असते, म्हणून या ठिकाणी एक नवीन अतिरिक्त  DP ची आपल्या स्तराच्या योजनेतून उभारणी करावी, अशी विनंती निवेदनातुन पत्रकार वसीम शेख अनवर यांनी विद्युत वितरण कंपनीकडे केली आहे. 
      दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मिर्झा नगर व इकबाल नगर भागात दरमहा विद्युत देयके भरण्यात येत असून विद्युत वितरण करणे हा अत्यावश्यक सेवेत येत आहे. म्हणून मिर्झा नगर जवळील मन्नू डोंगरे उर्दू शाळेजवळील विद्युत DP व्यतिरिक्त या परिसरात आणखी एक नवीन अतिरिक्त DP ची उभारणी करण्याच्या आमच्या मागणीचा सहानुभूती पूर्वक विचार करण्याची विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रतिलिपी जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.