अकोला मनपा निवडणूक प्रभारीपदी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे


अकोला मनपा निवडणूक प्रभारीपदी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे
सिंदखेडराजा : (एशिया मंच न्यूज )
       आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार गटाचे
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी गुरूवारी निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्यावर पक्षाने विश्वास टाकत त्यांच्याकडे अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक प्रभारीपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.

       पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. डॉ. राजेंद्र शिंगणे यांचा राजकीय अनुभव आणि संघटनात्मक बांधणीतील कौशल्य पाहता, अकोला महानगरपालिकेत पक्षाची ताकद वाढवण्यासाठी त्यांच्याकडे ही धुरा देण्यात आली आहे. डॉ. शिंगणे यांच्या निवडीमुळे अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये काँग्रेसच्या उत्साहाचे वातावरण आहे.