* शैलेश सावजी यांची निवेनाद्वारे मागणी
डोणगाव : (एशिया मंच न्यूज )
शेलगाव रस्त्यावरून गणेश शिवाजी इंगळे यांचे शेतापासून कहहाळवाडी नाल्याजवळील शाम अशोक खोटे यांचे शेतापर्यंत अंदाजे ४ किलोमीटर या रस्त्यापैकी मातोश्री पांदन रस्त्याअंतर्गत १ किलोमीटर रस्त्याला मंजुरात मिळाली. रस्त्याचे प्रत्यक्ष काम सुरू होणे बाकी आहे. या रस्त्यापैकी उर्वरित ३ किलोमीटरचा रस्ता हा मुख्यमंत्री बळीराजा पांदण रस्ते योजना अंतर्गत मंजूर करावा. अशी मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधवांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, सदर रस्त्यावरती २०२१ मध्ये लोकसहभागातून पूर्ण ४ किलोमीटरचे माती भरावाचे काम झालेले आहे. या रस्याचा खडीकरणाचा प्रस्ताव तलाठी डोणगाव भाग क्रमांक ३ यांनी ६ जुलै २०२२ रोजी तहसील कार्यालय मेहकर यांना दिलेला आहे. तहसील कार्यालय मेहकर यांनी हाच प्रस्ताव आपल्या कार्यालयात १३/२२ क्रमांकाने २२ सप्टेंबर २०२२ रोजी दाखल केलेला आहे.
Nया रस्त्यावरील दीपक खंडारे व इतर शेतकऱ्यांनी देखील ३ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्यमंत्री व अप्पर मुख्य सचिव रोहयो मंत्रालय मुंबई यांच्याकडेही या रस्त्याची मागणी केलेली आहे. आपण हा रस्ता अग्रक्रमांकाने मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून द्यावी, अशी विनंती वजा मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटू केली आहे.
