* शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांचा विकासात्मक दृष्टीकोन
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
जिल्ह्याच्या औद्योगिक क्षेत्रात नवीन उद्योगाची भर घालणाऱ्या चिखली येथील युवा उद्योजक नीलेश ठोसरे यांना नवीन व्यवसायासाठी शुभेच्छा देत शिवसेना (उबाठा) प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी विकासात्मक दृष्टीकोनाचा परिचय दिला.
बुलढाणा जिल्हा हा औद्योगिकरणात मागासलेला आहे, अशी ओरड कायम ऐकायला मिळते. मात्र औद्योगिक विकास कसा होऊ शकतो, त्यासाठी कोणती धोरणे राबवावी, नवीन उद्योजकांना पाठबळ देणे यादृष्टीने विचार होतांना दिसत नाही. परंतु शिवसेना प्रवक्ता जयश्रीताई शेळके हे असे नाव आहे ज्यांनी नव उद्योजकांना नेहमीच प्रोत्साहन, पाठबळ दिले आहे. नवीन व्यवसाय सुरु करणाऱ्या जिल्ह्यातील व्यक्तींचे त्यांनी सदैव कौतुक केले आहे.
नुकताच जयश्रीताई शेळके यांनी चिखली येथे २०१८ पासून बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे सिव्हिल इंजिनिअर नीलेश जगन्नाथ ठोसरे यांचा गौरव केला. उद्योजक नीलेश ठोसरे यांनी ‘ठोसरे कन्स्ट्रक्शन’नंतर आता ‘श्रीहरी इंडस्ट्रीज’च्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात पाऊल टाकले आहे. चिखली एमआयडीसीमध्ये त्यांच्या उद्योगाचा शुभारंभ सोहळा संपन्न झाला. ठोसरे यांनी वयाच्या अवघ्या २९ व्या वर्षी बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आणि आता नवीन औद्योगिक वाटचाल सुरु केली आहे.
