अक्षरक्रांती साहित्य संमेलनासाठी नजीम खान निमंत्रित

अक्षरक्रांती साहित्य संमेलनासाठी नजीम खान निमंत्रित 
चिखली : (एशिया मंच न्यूज )
          मराठी भाषा विभाग महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई व महाराष्ट्र शासन अनुदानित राम गणेश गडकरी प्रतिष्ठान प्रायोजित तथा कला गौरव संस्था नागपूर व अक्षरक्रांती फाऊंडेशन द्वारा संयुक्त विद्यमाने आयोजित दुसरे अक्षरक्रांती साहित्य संमेलन दिनांक २७ व २८ डिसेंबर २०२५ ला महात्मा फुले शिक्षण संस्था सभागृह रेशीम बाग नागपूर येथे ज्येष्ठ साहित्यिक  वसंत वाहोकार यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होत असून या संमेलनासाठी चिखली येथील सुप्रसिध्द मराठी कवी तथा गझलकार नजीम खान यांना निमंत्रित करण्यात आले आहे .
          दोन दिवसीय संमेलना दरम्यान अमरावती येथील सुप्रसिध्द मराठी गझलकार  नितीन देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील गझल मुशायऱ्यात नजीम खान यांची वर्णी लागली असून यानिमित्त त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.