शॉर्ट सर्किटमूळे ड्राय फ्रूटच्या दुकानाला आग* अडीच ते तिन लाखांचे नुकसान

शॉर्ट सर्किटमूळे ड्राय फ्रूटच्या दुकानाला आग
* अडीच ते तिन लाखांचे नुकसान
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
          शहरातील सर्क्युलर रोडवरील चौपाटी जवळ असलेल्या पर्वणी ड्राय फ्रूटच्या दुकानाला अचानक शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागली. ही घटना आज १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेदरम्यान घडली. या आगीत अंदाजे अडीच ते तिन लाखांचे नुकसान झाले आहे.

           शहरातील सर्क्युलर चौपाटी जवळ जगदेवराव बाहेकर यांचे कॉम्पेक्स आहे. या कॉम्पेक्स मध्ये अनिरुध्द जाधव यांचे पर्वणी स्पेशल ड्राय फ्रूट अॅण्ड मसालेचे दुकान आहे. ११.३० वाजता अनिरुध्द जाधव हे जेवणासाठी घरी गेले होते. त्याच दरम्यान दुकानातून धुर बाहेर येत असल्याचे काही नागरीकांना दिसले. नागरीकांनी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून उघडले. दुकानात आग लागलेलीच होती. यावेळी येथील नागरीकांनी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला फोन करुन माहिती दिली. थोड्याच वेळात अग्निशमनचे वाहन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगवर नियंञण मिळवले. नंतर या आगीची माहिती पर्वणी स्पेशल ड्राय फ्रूटचे मालक अनिरुध्द जाधव यांनाही दिली. दरम्यान या आगीत दुकानातील ड्राय फ्रूट, मसाले व इतर साहित्य जळले. या आगीत अंदाजे अडीच ते तिन लाखांचे नुकसान झाले आहे.