सय्यद इकबाल यांची अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड

सय्यद इकबाल यांची अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड 
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते सय्यद इकबाल यांची निवड  नुकतीच एका बैठकीत करण्यात आली. 

     धाड येथील सामाजिक कार्यकर्ते सय्यद इकबाल हे शरद पवार गटाचे मागील अनेक वर्षापासून पक्षासाठी कार्य करत आहेत, समाजसेवेचा त्यांना ध्यास असल्याने ते नेहमी आडी -अडचणीत असलेल्यांच्या मदतीसाठी धावुन जातात. त्यांच्या या कामामुळेच धाड परिसरात त्यांचा जनसंपर्क खूप मोठा आहे. त्यांच्या आतापर्यंतचे योगदान व पक्षनिष्ठा पाहता शरद पवार प्रणित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे  माजी मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या आदेशाने अल्पसंख्यांक विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर नियुक्ती ही मलकापूर रोड येथील राष्ट्रवादी भवन येथे पार पडलेल्या बैठकी दरम्यान करण्यात आले. 
         यावेळी अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष अफजल फारुख,  जिल्हाध्यक्ष नरेश शेळके यांच्या उपस्थितीत सय्यद इकबाल यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले तसेच पुढील निवडणुकीचे अनुषंगाने त्यांना पक्ष बांधणीचे जबाबदारीचे सह आदेश देण्यात आले. येत्या काळात पक्षाला अधिक बळकट करून यश मिळवून देण्याचे ध्येय यावेळी सय्यद इकबाल यांनी व्यक्त केले. या निवडीबद्दल मित्र परिवारात त्यांचे अभिनंदन होत आहे.

* पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करणार : सय्यद इकबाल 
       पक्षाच्यावतीने देण्यात आलेली जबाबदारी पूर्ण निष्ठा व परिश्रमाने पार पाडून येत्या काळात पक्षाला अधिक बळकट करण्यासाठी ग्रामीण स्तरावर पक्ष बांधणी करून पक्षाला मजबूत करण्यासाठी दिवस रात्र परिश्रम करणार असल्याची ग्वाही सय्यद इकबाल यांनी दिली.