* बुलढाण्यातील ‘दिनी इज्तिमा’ मध्ये विविधतेतून एकतेचे दर्शन!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा शहरा पासून जवळच असलेल्या पोखरी परिसरात १३ ते १५ डिसेंबर रोजी ‘दिनी इज्तिमा’हा मुस्लिम बांधवांचा कार्यक्रम पार पडला. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि वाशिम या पाच जिल्ह्यांतील हजारो मुसलमान बांधव एकत्र आले होते. या धार्मिक कार्यक्रमात हिरीरीने सहभागी होत शिवसाई परिवराने विविधतेतून एकता व भाईचाऱ्याचा परिचय दिला. आपण भारतीय आहोत सर्व धर्मांचा आदर करणे आपले पहिले कर्तव्य असल्याचे शिवासाई परिवाराचे अध्यक्ष प्रा. डी. एस. लहाने यावेळी म्हणाले.
तब्लिगी जमातच्या दिल्लीतील मरकज हजरत निजामुद्दीनच्या मार्गदर्शनाने हा इज्तिमा आयोजित करण्यात आला होता. सुमारे दिड महिन्यांपासून या इज्तिमाची तयारी सुरू होती. दिल्ली आणि देशातील इतर ठिकाणाहून आलेल्या उलमांनी
उपस्थिती लावली. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव या ठिकाणी उपस्थित झाले होते. त्यांच्या जेवण, फराळ, नास्ता याचा खारीचा वाटा प्रा.लहाने व शिवशाही परिवाराने उचलला. दुपारी चहा, फळे, व खाद्य पदार्थ पुरविण्यात आले.
काही ठिकाणी स्वयंसेवकांची गरज होती. पंजाबराव गवई, जगदेवराव जाधव, सुरडकर साहेब ,ॲड संदिप फौजी ,दिनकर पांडे, किरण पाटील, दिपक पाटील, गणेश निकम, गजानन मुळे, निलेश गाडेकर, रहमान खान, वकील खान, गुलाम रसूलखान, भीमराव पटेल ,रहमान कुरेशी, शेख मुजमिल ,अजीम कुरेशी ,शेख अल्ताफ ,अस्लम खान आदी यांनी सहकार्य केले. शिवसाई परिवार सामाजिक कार्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिला आहे. मुस्लिम बांधवांच्या कार्यक्रमातही त्यांनी सहकार्य करून आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
