* सुंदरखेड येथे 'आऊषा फाउंडेशन'तर्फे महिला संवाद मेळावा
* विविध विषयावर स्नेहा भंडारे यांनी साधला महिलांशी संवाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
आज महिला शिकल्या, नोकरी व्यवसायात व सार्वजनिक जिवनात सक्षमपणे महिला काम करीत आहेत. मात्र त्यांचे सामाजिक प्रश्न, वैयक्तीक व कौटुंबीक प्रश्न वेगळे आहेत. त्यांचे हे प्रश्न जाणून घेवून ते सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची समाजाला गरज आहे. आपण गेल्या अनेक वर्षापासून 'आऊषा फाऊंडेशन'च्या माध्यमातून हे काम करीत आहोत. यापुढे सुध्दा हे काम अविरतपणे सुरू राहणार असून त्यासाठी सुंदरखेड परिसारातील महिला भगीनींनी आपल्या सोबत काम करावे, कारण एक महिलाच दुसऱ्या महिलेचं दुःख जाणून घेवू शकते, त्यासाठी मी आपल्या सोबत आहे, असे प्रतिपादन 'आऊषा फाऊंडेशन'च्या अध्यक्षा स्नेहा भंडारे यांनी केले.
'आऊषा फाउंडेशन'च्या अध्यक्षा स्नेहा सिद्धार्थ भंडारे यांच्या पुढाकारातून सुंदरखेड परिसरातील महिलांसाठी रविवारी भव्य महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपिठावर महिला उपस्थित होत्या. या मेळाव्याच्या माध्यमातून स्नेहा भंडारे यांनी महिला भगिनींशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. यावेळी महिलांच्या दैनंदिन समस्या, त्यांच्या हक्क, अपेक्षा तसेच सामाजिक व विकासाशी संबंधित विविध विषयांवर खुली व सखोल चर्चा झाली. महिलांचे सक्षमीकरण, स्वावलंबन, शिक्षण, आरोग्य व सुरक्षितता या अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांना केंद्रस्थानी ठेवून महिला भगिनींच्या सूचना व मत ऐकून घेण्यात आली. महिलांचा आत्मविश्वास, सक्रिय सहभाग आणि सकारात्मक प्रतिसाद पाहून पुढील काळात महिलांच्या प्रश्नांसाठी अधिक प्रभावीपणे आवाज उठवण्याचा ठाम निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त करण्यात आला.
महिलांच्या बळावरच सशक्त समाज आणि प्रगत कुटुंब घडवता येईल, असा विश्वास या संवादातून अधिक दृढ झाला, अशा भावना स्नेहा भंडारे यांनी यावेळी व्यक्त केल्या. या महिला संवाद मेळाव्याला सुंदरखेड परिसरातील महिलांचा उस्फूर्त व भरगच्च प्रतिसाद लाभला.
