निवृत्ती जाधव यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर

निवृत्ती जाधव यांना समाजरत्न पुरस्कार जाहीर
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        संजिवनी बहु. शिक्षण प्रसारक संस्था केळवद ता. चिखली जि. बुलडाणा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निवृत्तीभाऊ जाधव यांना संत गाडगेबाबा समाज रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उत्सव यशाचा सन्मान कर्तुत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा २०२५ साखरखेर्डा ता. सिंदखेडराजा जि. बुलढाणा यांच्या वतीने मुख्य आयोजक सचिन खंडारे पत्रकार व भाई विकास सुखदाने निवड समिती अध्यक्ष यांनी नियुक्तीपत्र देऊन डॉ. निवृत्ती भाऊ जाधव यांना पुरस्कार जाहीर केलेला आहे.

       ५ मे रोजी गेल्या १८ वर्षापासून सामूहिक विवाह सोहळा सातत्याने घेतल्या जात आहे व वृक्षारोपण कार्यक्रम, झाडे लावा झाडे जगवा, कामगारांना पेटी वाटप, कामगारांच्या मुलांना शिष्यवृत्ती देणे, कामगारांसाठी काम करणे व महिलांसाठी शिवणकला प्रशिक्षण, ब्युटी पार्लर, कॉम्प्युटर ट्रेनिंग सेंटर संस्थेकडून सुरू आहे. गाव तेथे शेतकरी मंडळ नाबार्डच्या वतीने शेतकऱ्यांना प्रशिक्षण, मधमाशी प्रशिक्षण, शेळी पालन , प्रशिक्षण मत्स्यपालन प्रशिक्षण व इत्यादी प्रकारचे प्रशिक्षण संस्थेमार्फत दिल्या जातात. विधवा महिलांसाठी बाल संगोपन योजना, असंघटित कामगारांसाठी जनश्री योजना इत्यादी प्रकारचे समाज उपयोगी कार्यक्रम राबवीत आहे. त्या कार्याचे दखल घेऊन महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्रीच्या हस्ते शाहू, फुले, आंबेडकर पुरस्कार मिळालेला आहे व १ मे २०२५ रोजी जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री मकरंद आबा पाटील यांच्याहस्ते जिल्हा युवा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. मलकापूर येथील डिजीटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या वतीने राष्ट्र गौरव पुरस्कार २०२५ सुद्धा मिळालेला आहे. याच कामाची दखल घेऊन पत्रकार सचिन खंडारे यांनी डॉ. निवृत्ती भाऊ जाधव यांना राष्ट्रसंत गाडगेबाबा समाज रत्न राज्यस्तरीय पुरस्कार करता निवड करण्यात आली आहे. सदर पुरस्कार ३० डिसेंबर रोजी साखरखेर्डा येथे वितरण होणार आहे. तरी महाराष्ट्र भरामध्ये सर्व क्षेत्रांमध्ये आनंदाचे व कौतुकाचे वातावरण आहे.