शेखरने बॉक्सिग चॅम्पियन स्पर्धेत पटकविले रौप्य पदक

शेखरने बॉक्सिग चॅम्पियन स्पर्धेत पटकविले रौप्य पदक 
मोताळा : (एशिया मंच न्यूज )
   तालुक्यातील वाडी येथील शेतकरी कुटुंबातील युवक शेखर सुनील मिटकरे याने प्रतिकूल परिस्थिती, आर्थिक अडचणी आणि मर्यादांवर मात करत आपल्या स्वप्नांना राष्ट्रीय स्तरावर नेले आहे. शेतात राबणाऱ्या आई-वडिलांच्या कष्टांचे ऋण फेडण्यासाठी आणि आपल्या मेहनतीला अर्थ देण्यासाठी शेखरने 'खेळालाच' जीवनाचा मार्ग मानला.

         कष्ट, संघर्ष आणि जिद्दीच्या प्रत्येक टप्यावर त्याच्या घामाच्या थेंबांत आत्मविश्वास, स्वप्नं आणि यशाची आस दडलेली आहे. २६ ते २८ डिसेंबर २०२५ दरम्यान रोहा रायगड येथे पार पडलेल्या ६ वी नॅशनल मिक्स बॉक्सिग चॅम्पियनशिपमध्ये २३ वर्ष वयोगटातील ५६.९ किलो वजन गटात खेळत शेखर मिटकरे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत तृतीय क्रमांकासह रौप्य पदक पटकावले. याआधीही त्यांनी ४०० मीटर धावण्याच्या राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून आपली क्रीडा गुणवत्ता सिद्ध केली होती. या यशामागे मार्गदर्शक श्याम कानडजे व प्रक्षिक्षक गणेश पेरे यांचे अमूल्य मार्गदर्शन लाभले असून शेखरची ही संघर्षातून घडलेली यशोगाथा ग्रामीण भागातील असंख्य युवकांना नवी उमेद, आत्मविश्वास आणि प्रेरणा देणारी ठरत आहे.