मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदारांचा गाढ विश्वास* अल्पावधीत जमा झाली एक कोटीची ठेव!

मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेवर ठेवीदारांचा गाढ विश्वास
* अल्पावधीत जमा झाली एक कोटीची ठेव!
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        बुलढाण्यात मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्थेचे उद्घाटन झाले आहे. अल्पावधीतच संस्थेने करोडोच्या ठेवी जमा करत सहकार क्षेत्रामध्ये दमदार पाऊल ठेवले आहे. 31 डिसेंबर पूर्वी सभासदांना ठेवीसाठी टार्गेट निर्धारित करण्यात आले होते. त्यानुसार एक कोटी रुपयांच टार्गेट पूर्ण करत संस्थेच्या ठेवींमध्ये सभासदांनी महत्त्वाची भर घातली याबद्दल मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी त्यांचा सत्कार केला. गोडे स्टॉप येथील माऊली हाइटस येथील संस्थेच्या कार्यालयात हा कार्यक्रम पार पडला.

          मराठा सेवा संघ नागरी सहकारी पतसंस्था अध्यक्ष शिवश्री डॉ. मनोहर तुपकर, उपाध्यक्ष शिवश्री रविकांत काळवाघे व सचिव शिवश्री पी.एम. जाधव यांच्या नेतृत्वात वाटचाल करीत आहे. संस्थेकडे असणारा संचालकांचा उच्च्यशिक्षित बौद्धिक वर्ग पाहता सुरुवातच दमदार झाली.
        सर्व संचालक मंडळ यांनी दिलेले टार्गेट पूर्ण करत आज डिसेंबर समाप्तीच्या पर्वावर एक  कोटी रुपयाच्या ठेवी देखील पूर्ण केल्या. याबद्दल सर्व पदाधिकारी यांचा सत्कार मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री रविंद्र चेके तथा जिजाऊ सृष्टी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवश्री सुभाषराव कोल्हे, संभाजी ब्रिगेडचे शिवश्री योगेश पाटील तसेच जिजाऊ सृष्टीचे व्यवस्थापन समितीचे सदस्य शिवश्री विवेक काळे, शिवश्री संजय विखे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 
         यावेळी बोलताना जिजाऊ सृष्टी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिवश्री सुभाषराव कोल्हे यांनी सदर पतसंस्थेची उत्तरोत्तर प्रगती होत राहो व लवकरच पतसंस्था मल्टीस्टेटच्या दिशेने वाटचाल करावी अशा शुभेच्छा दिल्या. आभार संस्थेचे सचिव शिवश्री पी.एम. जाधव यांनी मानले.