पत्रकार रविंद्र फोलाने यांना मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार घोषीत

पत्रकार रविंद्र फोलाने यांना मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार घोषीत
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
     निर्भीड व उत्तुंग विचारांचे मराठी साहित्यिकांचे विचारपीठ असलेल्या साप्ताहिक झेपच्या वतीने यावर्षी देण्यात येणारा अत्यंत प्रतिष्ठेचा मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील पत्रकारिता क्षेत्रात ३५ वर्षापासून कार्य करणारे पत्रकार रविंद्र फोलाने यांना जाहीर झाला आहे.
           शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, क्रिडा, आरोग्य, कला, पत्रकारिता, कृषी आणि विज्ञान क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. सदर पुरस्कार हे प्रख्यात व्याख्याते तथा विचारवंत प्रा. डॉ. शिवानंद भानुसे यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजीनगर येथे २१ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या २० वे झेप साहित्य समेलनात प्रसिद्ध लेखक तथा समीक्षक प्रा.डॉ. ऋषीकेश कांबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
       यावेळी झेप साहित्य संमेलनाचे उदघाटक म्हणून विधिज्ञ डॉ. विजयकुमार कस्तुरे, झेप पुरस्कार निवड समिती अध्यक्ष श्रीमती ए.बी. साळवे, स्वागताध्यक्ष उषाताई घायतडक, परिसंवाद अध्यक्ष डॉ. मिलींद रणवीर, कविसंमेलन अध्यक्ष डॉ. बलराज पांडवे, प्रा. शिवाजी वाठोरे, स.सो. खंडाळकर, डॉ. सावली राऊत, प्रा. डॉ. राजेंद्र शेजूळ, प्रा. डॉ. पंडित आराक, प्रा. सुनील पोवळे, प्रा. ज्ञानेश्वर गोराडे, प्रा. सिध्दार्थ बनसोडे, सुर्यकांत तेलगोटे, प्रा. संजय बोरकर, प्रा. अरुण साळवे, रूपकांत घनघावे दीपक सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे.
        पत्रकार रविंद्र फोलाने यांनी आतापर्यंत दै. नमो महाराष्ट्र, दै. लोकदूत, दै. नेतृत्व, क्रीडा समाचार, दै. विदर्भ दर्पण या वृत्तपत्रात प्रतिनिधी म्हणून काम केले असून सन २०१४ पासून ते चिखली एक्सप्रेस हे साप्ताहिक वृत्तपत्र तर वृत्तधर्म हे दैनिक वृत्तपत्र नियमित प्रकाशित करीत आहेत. पत्रकार रविंद्र फोलाने यांना मातोश्री हरणाबाई जाधव राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार घोषीत झाल्याबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.