अखेर 'त्या' बेपत्ता अल्पवयीन मुलींचा लागला शोध

अखेर 'त्या' बेपत्ता अल्पवयीन मुलींचा लागला शोध
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
       जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील वर्ग दहावीत शिकणाऱ्या तीन मैत्रिणी दिनांक ५ डिसेंबर २०२५ रोजी जळगाव जामोद शहरातील शासकीय तंत्रनिकेतन मध्ये तंत्रशिक्षणासाठी गेल्या होत्या. परंतु त्या सायंकाळी घरी परत आल्या नव्हत्या, तिन्ही मुलींच्या पालकांनी जळगाव शहरात जाऊन बस स्थानक परिसर व मैत्रीणीकडे व नातेवाईक यांच्यासह सर्वत्र शोध घेतला परंतु त्या मिळुन आल्या नाहीत. त्यामुळे तिन्ही अल्पवयीन मुलींच्या पालकांनी पोलीस स्टेशन गाठले व सर्व सविस्तर माहिती ठाणेदार नितीन पाटील यांना सांगितल्या प्रमाणे पोलीस स्टेशनला अज्ञात व्यक्तीविरुद्ध अप.क्र.५७८/२०२५ कलम १३७ (२) भारतीय न्यायसंहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 
         ठाणेदार नितीन पाटील यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोळ, पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय नागेश खाडे, महिला पीएसआय स्नेहा शेंडगे, सुनगांव बीट अंमलदार इरफान शेख, सचिन राजपुत, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंढे यांनी दिनांक ५ डिसेंबर च्या रात्री सर्व परिसर पिंजून काढला परंतु तिन्ही अल्पवयीन मुलींचा शोध लागला नाही. पोलीसांनी तपास चक्रे फिरवून तांत्रिक माहिती, व गोपनीय तपास यंत्रणा, स्थानिक गुन्हे शाखेच्या माहितीच्या आधारे  ६ डिसेंबर रोजी गोपनीय माहितीच्या आधारावर दोन पथकं शोध मोहीमेसाठी नाशिक, पुणे येथे पाठविण्यात आले होते. यातील तीनही अल्पवयीन मुली ह्या पुणे येथे जात असताना सुपे पोलीस स्टेशन हद्दीत मिळुन आल्या आहेत. जळगांव जामोद पोलिसांनी तब्बल ३६१ कि.मी चा प्रवास जवळपास ९ तासांच्या अथक परिश्रमाने पूर्ण करत तीनही बेपत्ता झालेल्या सुनगाव येथील अल्पवयीन बेपत्ता मुलींचा शोध अखेर पोलिसांनी मोठ्या शर्थीने लावला असुन, सुपे पोलीस स्टेशन गाठुन जळगाव पोलीस पथकाने तीनही बेपत्ता मुलींना ताब्यात घेतले असून पुन्हा ३६१ किलोमीटर ९ ते १० तासाचा प्रवास करत ह्या तीनही अल्पवयीन मुलींना तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. 
        सदर ही यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर, जळगाव जामोद ठाणेदार नितीन पाटील यांच्या आदेशाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश मोहोड, पीएसआय नारायण सरकटे, पीएसआय नागेश खाडे, सुनगांव बिट अंमलदार शेख इरफान, सचिन राजपुत, संदीप रिंढे यांनी यशस्वी पणे पार पाडत मुलींना ताब्यात घेतले असून जळगाव पोलीस परतीच्या मार्गाने लागले आहेत.