* केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभियानाला गती देण्यासाठी केले लोकप्रतिनीधींना आवाहन !
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
देशातील क्षयरोगातुन होणारा मृत्युचा दर हा 25% ने कमी झाला आहे. हे देशाच्या आरोग्य विभागाचे यश आहे. पंतपंधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील टि.बी.मुक्त भारत देश निर्माण करण्यासाठी देशातुन क्षयारोगाचे उच्याटन करु या असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी व्यक्त केले. तर क्षय मुक्त भारत करण्यासाठी लोकप्रतिनिधीचा सहभागी महत्वपूर्ण असल्याचे मत केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी व्यक्त केले.
देशातुन क्षयरोगाच समुच्य निर्मुलन करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने विशेष टि.बी. मुक्त अभियान देशभर राबविण्यात येत आहे. याच अभियानाच्या संदर्भांत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक 3 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी मार्गदर्शन करतांना केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा बोलत होते. ते पुढे म्हणाले की, 2015 नंतर टि.बी.च्या रुग्णसंख्येत 21% आणि मृत्युदरात 25% घट झाली आहे. ही भारताच्या आरोग्य विभागाची मोठी उपलब्धी आहे. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, नागरी हवाई उड्डयन मंत्री मुरलीधर मोहळ उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत देश क्षयरोग मुक्त (टि.बी.मुक्त) करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अमलबजावणी महाराष्ट्रात सुध्दा व्हावी, या दृष्टिकोनातन या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीला केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सुध्दा मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, टि.बी.मुक्त अभियानाला गती देण्यासाठी लोकप्रतिनीधींचा सहभाग महत्वपुर्ण आहे. प्रत्येक लोकप्रतिनीधीनीही त्यांच्या मतदार संघामध्ये आढावा घेऊन या अभियानाला गती देण्याचे काम केल्यास पंतपंधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील टि.बी.मुक्त भारत होण्यास वेळ लागणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे टि.बी.मुक्त भारत देश हे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्वांनी या अभियानांत सहभागी होऊ या असे आवाहन केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी याप्रसंगी केले. या बैठकीला उपस्थित असलेल्या महाराष्ट्रातील खासदारांनी या अभियाना संदर्भांत सकारात्मक चर्चा केली. हे अभियांन यशस्वी करण्याचा संकल्पही केला. या बैठकीला विविध राजकिय पक्षाचे खासदार उपस्थित होते.
