* बेकायदेशीर नियुक्ती प्रकरण; डॉ. छाजेडसह १० जणांवर गुन्हा
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बेकायदेशीर नियुक्ती प्रकरण शहरातील धाड नाका परिसरातील मूकबधिर निवासी विद्यालयाच्या संचालक मंडळास चांगलेच भोवले आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन डॉ. सुरेश छाजेडसह १० जणांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे खासगी संस्थांचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
माजी विशेष शिक्षिका पुष्पा अंबादास बरगट (रा.शास्त्रीनगर मुठेठे ले-आउट बुलढाणा) मूकबधिर निवासी विद्यालयात विशेष शिक्षिका म्हणून नोकरीवर होती. आरोपींनी फिर्यादीचा प्रथम नियुक्तीचा कायदेशीर अधिकार डावलून प्रियंका माळी हिची सदर विद्यालयावर बेकायदेशीर नियुक्ती केली. त्याबाबत उच्च न्यायालय नागपूर येथे रीट पिटीशन (2669/2021) मध्ये आरोपींनी दाखल केलेल्या दस्तऐवजावर फिर्यादीची खोटी व बनावट स्वाक्षरी करून फसवणूक केली. सदर बनावट कागदपत्रे खरे असल्याचे भासवून विश्वासघात केला,अशा आशयाची तक्रार विद्यमान उच्च न्यायालयात फिर्यादीने दाखल केल्याने पंकज देशपांडे (जेएमएफसी) कोर्ट दुसरे बुलढाणा यांचे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलमा अंतर्गत 175(3) एम गुन्हा क्रमांक सीआरआय एम ए नं.281/2025 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत.
आरोपींमध्ये डॉ. सुरेश मिश्रीलाल छाजेड, वय 72 वर्ष, डॉ. प्रकाश मथुरादास गुप्ता वय 72 वर्ष, रा. आशिर्वाद हॉस्पीटल, चर्च जवळ, बुलढाणा, विजय वसंत व्यवहारे रा.टि.व्ही. सेंटरसमोर, बुलढाणा, अजय मोहन कारंजकर वय 69 वर्ष, रा मलकापूर रोड, गजानन टॉकीजसमोर, बुलढाणा, श्रीमती डॉ. सुरेखा रविंद्र जतकर वय 60 वर्ष, रा. जैस्वाल ले-आउट, बुलढाणा, प्रकाश रमाकांत महाजन वय 75 वर्ष, देशमुख मंगल कार्यालयसमोर बुलढाणा, डॉ. चंद्रकांत नामदेव उमाळे, वय 66 वर्ष, रा. दलाल ले-आउट, बुलढाणा, संजय मुरलीधर देशपांडे, वय 66 वर्ष रामनगर, बुलढाणा. जयसीह भगवंतसींग जैयवार वय 60 वर्ष, रा. जांभरून रोड, बुलढाणा, रमेश मल्हारी इंगळे, वय 62 वर्ष रा. शांती नगर, बुलढाणा यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे शैक्षणीक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
