दत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरिञ पारायण सप्ताहाची महाप्रसादाने सांगता
बुलडाणा : (एशिया मंच न्यूज )
येथील राजे संभाजी नगर स्थित श्री संत गंगामाई स्थापीत जागृत श्री दत्त मंदीर येथे सालाबादाप्रमाणे यंदाही श्रीदत्त जयंती निमीत्त श्री गुरुचरीञ पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहाची आज ६ डिसेंबर रोजी महाप्रसादाने सांगता करण्यात आली.
श्री दत्त मंदीर येथे २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दररोज सकाळी ८ ते १० श्री सत्यदत्त पुजा व अभिषेक , सप्तशक्ती पाठ, सकाळी १० ते दुपारी ३ श्री गुरुचरिञ पारायण व सायंकाळी ६.३० ते ७ नामस्मरण, आरती. २८ नोव्हेंबर रोजी ३ ते ६ श्रीराम जानकी महिला भजनी मंडळ बुलढाणा, रात्री ८ ते १० पो.कॉ. श्रीकृष्ण चव्हाण व सहकारी धामणगाव बढे, २९ नोव्हेंबर दुपारी ३ ते ६ श्री गजानन महिला भजनी मंडळ आणि संच, रात्री ८ ते १० सुयोग भजनी मंडळ आणि संच यांचे किर्तन, ४ डिसेंबर रोजी श्री गणपती मंदीर सराफा लाईन बुलढाणा यांची काकड आरती पार पडली.
सायंकाळी ४ ते ६ हभप अनंत महाराज चिंचोळकर यांचे दत्तजन्म उत्सव व त्यानंतर सायंकाळी ५.४६ वाजता पालखी मिरवणूक, पाळण व आरती, सायंकाळी ७ ते १० मिरवणूक, ५ डिसेंबरला दुपारी ४ ते ६ गोपाळकाला प्रित्यथ हभप अनंत महाराज चिंचोळकर बुलडाणा यांचे काल्याचे किर्तन पार पडले. आज शनिवारी ६ डिसेंबर रोजी श्री गुरुचरीञ पारायण सप्ताहाची वरण, भात, पोळी, भाजी, गोड शिऱ्याच्या प्रसादाचे वितरण करण्यात करुन सांगता करण्यात आली. यावेळी असंख्य दत्त भक्तगण व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. सोहळ्याला श्रीदत्त मंदीर ट्रस्ट, बुलडाणा व समस्त दत्त भक्तगण मंडळींनी परिश्रम घेतले.
