बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
बुलढाणा बसस्थानकावर 6 डिसेंबर या 69 व्या महापरिणीर्वाण दिनानिमीत्त विश्वरत्न महामानव डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. बुलडाणा आगाराचे आगार व्यवस्थापक अमोल गडलींग कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बुलडाणा जिल्हा रिपब्लिकन पार्टी ॲाफ इंडीया आठवले गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख पत्रकार बाबासाहेब जाधव सर्वप्रथम डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे मेनबत्ती आगरबत्ती पुष्पानी पुजन करून बुध्द वंदना घेऊन कार्यक्रम सुरू करण्यात आला .
या कार्यक्रमाचे प्रस्तावीक एस.टी. कास्ट्राईब राज्य परिवहन संघटनेचे विभागीय सचिव भारत आराख यांनी केले. त्यांनी आपल्या प्रस्ताविकेत डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. बुलडाणा आगार व्यवस्थापक अमोल गडलींग यांनी १८९१ पासून ते १९५६ पर्यंतच्या जीवन प्रवासात डॅा.बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाच्या व देशासाच्या विकासासाठी काय, काय केले यावर प्रकाश टाकला.
या महापरिनिर्वाण दिन कार्यक्रमाचे प्रमुख बाबासाहेब जाधव यांनी भारतीय सविधानावर भाष्य केले. जीवनात जर यशस्वी होण्यासाठी प्रत्येकांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार डोक्यात घेऊन प्रत्यक्षात आचरणात आणावयास पाहीजे, तोच व्यक्ती आणि तोच समाज प्रगती पथावर जाऊ शकतो. नुसती भाषणबाजी करावयाची डॅा. बाबासाहेब आंबेडकरांनी काय केले आणि कसे केले. हे छाती फूगून सांगतील पण त्यातून आम्ही आपण काय शिकलो ते मात्र कोणीच सांगत नाही. तर पहीले आपण स्वत: डॅा.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, इतरांना सांगा हाच डॅा.बाबासाहेब आंबेडकरांना खरी श्रध्दांली ठरेल, असे विचार पत्रकार बाबासाहेब जाधव यांनी 69 व्या महारिणीर्वाण दिनी व्यक्त केले. बुलडाणा बसस्थानक प्रमुख कृष्णा पवार, सहाय्यक वाहतूक निरीक्षक पद्माकर मगर यांनी डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकून आदरांजली वाहिली. यावेळी वाहतूक नियंत्रक जितू साळवे, महाराष्ट्र कामगार सेनेचे विभागीय अध्यक्ष संजय उबरहंडे, गणेश झोटे, प्रल्हाद कांबळे, किशोर खरात, आत्माराम चौतमोल, अशोक गवई, विनोद वावळे, विजू खंडारे, प्रमोद पवार, वसंत आराख, गौतम जाधव, महेंद्र गवई, किर्ती दाभाडे, सविता ठाकरे, अनिल मोरे, संजय चितळे तसेच बुलडाणा आगाराचे सर्व संघटनेचे पदाधिकारी रा.प. कर्मचारी व बुलडाणा बसस्थानकावरील प्रवासी वर्ग बहुसंख्येने महामानवाला अभिवादनाला उपस्थित होता.
सुत्रसंचलन, आभार प्रदर्शन एस.टी. कास्ट्राईब रा.प. संघटनेचे विभागीय अध्यक्ष दिपक मिसाळकर यांनी केले.
