बोगस मतदानामागचा मुख्य सूत्रधार कोण?* दोषींवर कठोर कारवाई करण्याची जयश्रीताई शेळकेंची मागणी* हिवाळी अधिवेशनात गाजणार बोगस मतदानाचा मुद्दा

बोगस मतदानामागचा मुख्य सूत्रधार कोण?
* दोषींवर कठोर कारवाई करण्याची जयश्रीताई शेळकेंची मागणी
* हिवाळी अधिवेशनात गाजणार बोगस मतदानाचा मुद्दा  
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
      बोगस मतदानाचे अनेक प्रकार बुलढाण्यात समोर आले आहेत. याबाबतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याप्रकरणी संबंधित सर्वच दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच यामागचा सूत्रधार कोण आहे? याचा छडा लावून त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई, करावी अशी मागणी शिवसेना (उबाठा) प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली.

       नगरपालिका निवडणुकीत बुलढाण्यात बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यास नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात आले. आयटीआय मतदान केंद्रावर एकास पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. मात्र त्याचवेळी पोलिसांच्या हातातून पळवून लावण्यास मदत करणाऱ्यावर  याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची सर्व स्तरातून समोर आली. अखेर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले. मात्र एवढ्यावर थांबून जमणार नाही. बोगस मतदान हा गंभीर गुन्हा आहे. लोकशाही प्रक्रिया धोक्यात आणण्याचा हा प्रकार आहे. यामधील दोषींना सहज सोडून दिले तर धाक उरणार नाही. त्यामुळे याप्रकणी कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी शिवसेना (उबाठा) पक्षाकडून करण्यात आली. बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणारे, त्यांना मदत करणारे यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे, मात्र सर्वात आधी यामागचा मुख्य सूत्रधार कोण? याचा छडा यंत्रणेने लावावा,  सोबतच बुलढाणा शहरात मोठ्या प्रमाणात बोगस मतदान कार्ड, आधार कार्ड हे बनविल्या जात असून या सर्व प्रकाराची चौकशी करावी, अशी मागणी प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी केली आहे. हिवाळी अधिवेशनात बोगस मतदानाचा मुद्दा गाजणार असून सत्ताधारी यांना विरोधक चांगलेच धारेवर धरणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.