* बुलढाण्यात सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा उपक्रम
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही 6 डिसेंबर रोजी शहरातील जयस्तंभ चौकस्थित गांधी भवन प्रांगणात सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेच्या कालावधीत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता अभिवादन कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती महात्मा जोतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीकडून देण्यात आली आहे.
महापरिनिर्वाण दिनाला रक्तदान शिबिर घेवून गरजूंना मदत करण्याची परंपरा लाभली आहे. त्यानुसार, यंदाही विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रक्तदानाच्या माध्यमातून अभिवादन करण्यात येणार आहे. सामान्य रुग्णालयात रक्त पिशव्यांची कमतरता असल्याने अनेक गोरगरीब रुग्णांची गैरसोय होते. त्यांना रक्त टंचाई भासू नये व आरोग्याविषयी अडचणी निर्माण होवू नये, ही बाब लक्षात घेवून रक्तदान शिबिराचे आयोजन होत असते. त्यामुळे या रक्तदान शिबिरात तसेच अभिवादन कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे 2025 चे अध्यक्ष पत्रकार निलेश राऊत यांनी केले आहे.
