धनशक्तीविरुद्धच्या लढाईत जनशक्तीचा विजय होईल- जयश्रीताई शेळके* बुलढाणा नगर पालिका नागराध्यक्ष निवडणूक

धनशक्तीविरुद्धच्या लढाईत जनशक्तीचा विजय होईल- जयश्रीताई शेळके
* बुलढाणा नगर पालिका  नागराध्यक्ष निवडणूक
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
        बुलढाणा शहरात नगरपालिका निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बोगस मतदानाचा प्रयत्न होत आहे. आम्ही यासंदर्भात पोलीस अधीक्षकांना भेटून माहिती दिली. लोकशाही विरुद्ध दंडेलशाही, जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशी ही निवडणूक होत आहे. यामध्ये जनशक्तीचा विजय होईल, असा विश्वास शिवसेना उबाठा प्रवक्ता जयश्रीताई शेळके यांनी बोलून दाखवला.

        विधानसभा निवडणुकीत आम्ही बोगस मतदानाचा प्रकार थांबवू शकलो नाही. मात्र नगरपालिका निवडणुकीत आम्ही हा प्रकार होऊ देणार नाही. पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की, अत्यंत ताकदीने त्यांनी हे बोगस मतदान थांबवले पाहिजे. निवडणूक पारदर्शीपणे झाली पाहिजे.