* महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी जिल्हा वकील संघाच्या सदस्यांसोबत साधला संवाद
बुलढाणा : (एशिया मंच न्यूज )
नगर पालिका निवडणूक प्रचारात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्य प्रवक्ता तथा स्टार प्रचारक जयश्रीताई शेळके फ्रंटवर असून जिल्हाभर सभा, बैठका घेत आहेत. त्यांच्या आवाहनाला मतदारांकडून भक्कम प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी त्यांनी बुलढाणा येथील जिल्हा सत्र न्यायालय जिल्हा वकील संघातील सर्व सदस्यांसोबत संवाद साधला.
बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार लक्ष्मीताई दत्ता काकस आणि नगरसेवक पदाचे महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन जयश्रीताई शेळके यांनी केले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, वकील संघाचे अध्यक्ष ऍड. विजय सावळे, ऍड. शरद राखुंडे यांच्यासह शहरातील नामवंत वकील व दत्ता काकस, शिवसेना तालुका प्रमुख विजय इतवारे, गजानन धांडे उपस्थित होते.
